Header AD

डोंबिवलीत सात हजार दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन




डोंबिवली ( शंकर जाधव )  शुक्रवारी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने घरोघरी आणि सार्वजनिक उत्सव मंडळांमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. मनोभावे पूजाअर्चा केल्यानंतर डोंबिवलीत शनिवारी सुमारे सात हजार दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले. 'गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर म्हणत गणेश भक्तांनी बाप्पाला निरोप दिला.




शहरात तसेच ग्रामीण भागात गणेश विसर्जनासाठी विविध ठिकाणी नैसर्गिक तलावांसह कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली होती. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.शुक्रवारपासूनच पावसाची रिपरिप असल्याने आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध असल्याने गणेश भक्तांना नातेवाईक व मित्रपरिवार मंडळीकडील गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी समस्या जाणविल्याची चर्चा होती.




पश्चिमकडील विष्णूनगर पोलीस ठाणे हद्दीत जुनी डोंबिवली, मोठागांव, देवीचापाडा, गणेशनगर आणि कोपरगांव अशा पाच ठिकाणी बाप्पाच्या विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली असून भागशाळा मैदान व दीनदयाळ गार्डन येथे दोन कृत्रिम तलावांची सुविधा केली होती. रामनगर पोलीस ठाणे अंतर्गत संगीतावाडी, बालाजी गार्डन, आयरेगांव, चोळेगांव आणि पंचायत बावडी या ठिकाणी गणेश विसर्जनाची व्यवस्था होती. 




टिळकनगर पोलीस ठाणे अंतर्गत अयोध्यानगरी, भोईरवाडी, वीर सावरकर रोड, टिळकनगर ठिकाणी तीन कृत्रिम व एक नैसर्गिक तलावांमध्ये गणपतीचे विसर्जन झाले. मानपाडा पोलीस ठाणे अंतर्गत पिसवली, गोळीवली, लोढा हेवन, भोपरगांव, देसाई नदी आदी विसर्जन घाटावर बाप्पांचे विसर्जन झाले.

डोंबिवलीत सात हजार दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन डोंबिवलीत सात हजार दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन Reviewed by News1 Marathi on September 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads