Header AD

शहरातील अनधिकृत फेरीवाले व हातगाड्यांवर महापालिकेची धडक कारवाई

 


■नौपाडा- स्टेशन परिसर, सॅटिस, कोपरी परिसरात करण्यात आलेल्या कारवाईची छायाचित्रे 


■कळवा, विटावा, खारीगांव परिसरात करण्यात आलेल्या कारवाईची छायाचित्रे..


ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी अनधिकृतपणे उभे राहत असलेल्या फेरीवाले व हातगाड्यांमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत धडक कारवाई करण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिल्यानंतर आज ठाणे व कळवा परिसरातील फेरीवाले, हातगाड्या व दुकानासमोरील फूटपाथ अडवून विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.            ठाणे शहरात सकाळी 7 ते दुपारी 3 व दुपारी 3 ते 11 या दोन सत्रात कारवाई सुरू करण्यात आली आहे. ठाणे स्थानक परिसर, मार्केट परिसर व नौपाडा कोपरी  परिसरात कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान ठाणे मार्केट परिसरात 10 ते 12 हातगाड्या जप्त करण्यात आल्या तसेच मार्केट परिसरात दुकानांसमोरील फूटपाथवर विक्री करणाऱ्या 120 किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. यावेळी सॅटिस परिसर, मार्केट परिसर व नौपाडा- कोपरी परिसरातील फूटपाथवरील अतिक्रमण हटवून हा परिसर फेरीवाला मुक्त करण्यात आला. सदर कारवाई दरम्यान ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे उपस्थित होते.
कळवा परिसरातही कारवाई


कळवा प्रभाग समितीअंतर्गत कळवा नाका, कळवा बाजारपेठ, कळवा पूर्व,  विटावा, आत्माराम पाटील चौक, खारीगांव मार्केट परिसर, 90 फूट रोड या परिसरात कारवाई करण्यात आली. यात 18 हातगाडी विक्रेते तर दुकानांसमोर फूटपाथवर विक्री करणाऱ्या 45 विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.       सदर दोन्ही ठिकाणची कारवाई ही सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली  लोकमान्यनगर, वागळे इस्टेट, नौपाडा प्रभागसमितीतील अधिकारी कर्मचारी, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या सहाय्याने केली.

शहरातील अनधिकृत फेरीवाले व हातगाड्यांवर महापालिकेची धडक कारवाई शहरातील अनधिकृत फेरीवाले व हातगाड्यांवर महापालिकेची धडक कारवाई Reviewed by News1 Marathi on September 02, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads