Header AD

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने कल्याण करांसाठी रुग्णवाहिका सेवा
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : पोलिसांना  व गोरगरिबांना महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या माध्यमातून रुग्णवाहिका कमी दरामध्ये उपलब्ध करून दिल्या असून या रुग्णवाहिकेचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. यावेळी खडकपाडा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार, पोलीस निरीक्षक जिने, बॉम्ब शोधक पथक पीएसआय पाटोळे यांच्या माध्यमातून व महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या माध्यमातून गोरगरिबांना व पोलिसांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या.या उद्घाटन समारंभामध्ये महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना ठाणे जिल्हा अध्यक्ष उमेश भारती यांसोबतच बदलापूर शहर अध्यक्ष सचिन पाटील, कोषाध्यक्ष मोहित गोळेशहर कार्याध्यक्ष जयेश चव्हाणशहर युवती संपर्कप्रमुख भूमी देठे व शहर सदस्य राज सोनवणे, कल्याण संपर्कप्रमुख मल्लिक अहिरे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे सल्लागार सुनील उत्तेकर यांनी उपस्थिती दर्शवली.
 महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना ही सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी व पोलिसांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना आहे. ती नेहमीच लढत राहीलमहाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या रुग्णवाहिकांचा वापर गोरगरिबांसाठी व सामान्य जनतेसाठी तसेच पोलिसांसाठी केला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने कल्याण करांसाठी रुग्णवाहिका सेवा महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने कल्याण करांसाठी रुग्णवाहिका सेवा Reviewed by News1 Marathi on September 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads