Header AD

कल्याण डोंबिवली मध्ये काँग्रेस आपल्या दारी पक्षाला नव संजीवनी देण्याचा जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांचा प्रयत्न
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  येत्या काही महिन्यांत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका असून या निवडणुकीला सामोरे जातांना पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कल्याण डोंबिवली मध्ये कॉंग्रेस आपल्या दारी हि मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेद्वारे पक्षाला नवसंजीवनी देण्याचा जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांचा प्रयत्न सुरु आहे.कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांच्या आदेशानुसार तसेच माजी आमदार आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव संजय दत्त यांच्या सूचनेनुसार आणि कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश सारचिरणीस ब्रिजकिशोर दत्त, महाराष्ट्र प्रदेश सचिव संतोष केणे यांच्या सहकार्याने काँग्रेस आपल्या दारी हे अभियान शनिवारपासून सुरू केले आहे. या अभियाना मध्ये काँग्रेसची विचारधारा मानणारे सामाजिक कार्यकर्ते तसेच काँग्रेसचे सर्व आजी माजी नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते
            यांच्या घरी भेट देऊन येणाऱ्या महापालिकेच्या निवडणूका संदर्भात काँग्रेस पक्षाची संघटना बळकट करण्यासाठी सर्व जिल्ह्यामध्ये बूथ कमिटी पासून वॉर्ड कमिटी पर्यंत नव्याने पुनर्रचना करण्याचे काम या अभियाना अंतर्गत करण्यात येणार आहे. काँग्रेस आपल्या दारी अभियाना अंतर्गत जिल्ह्याच्या प्रत्येक ब्लॉक मध्ये जाऊन पक्ष्याच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मिटिंग घेऊन येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये स्वबळावर लढण्यासाठी तयारी करण्याचे निर्देश देण्यात येतील.
           काँग्रेस आपल्या दारी हे अभियान ११ सप्टेंबर पासून ३० सप्टेंबर पर्यंत राबवून जिल्ह्यातील सर्व बूथ कमिटी तयार करण्याचे काम करण्यात येईल. जर कोणी बूथ कमिटी ते वॉर्ड कमिटी पर्यंत या अभियाना अंतर्गत तयारी केली नाही तर त्यांना पदावरून निष्कसित करण्यात येईल. तसेच काँग्रेस आपल्या दारी या अभियाना अंतर्गत काँग्रेस पक्ष तळागाळातील सामान्य लोकां पासून ते कला, क्रीडा, साहित्य या क्षेत्रात काम करणाऱ्या आणि जी लोक राजकारणा विरहित सामन्यासाठी काम करीत आहेत त्यांच्या घरी भेट देऊन काँग्रेस पक्ष्याची विचारधारा पुन्हा रुजविण्याचे काम करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.काँग्रेस आपल्या दारी या अभियाना अंतर्गत महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल, अल्पसंख्यांकअनुसूचित जाती या सर्व सेलच्या अध्यक्षांना व इतर सेलच्या सर्व सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना घेऊन हे अभियान यशस्वी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी सांगितले.

कल्याण डोंबिवली मध्ये काँग्रेस आपल्या दारी पक्षाला नव संजीवनी देण्याचा जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांचा प्रयत्न कल्याण डोंबिवली मध्ये काँग्रेस आपल्या दारी पक्षाला नव संजीवनी देण्याचा जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांचा प्रयत्न Reviewed by News1 Marathi on September 13, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads