Header AD

पुणे वडोदरा मार्गातील बाधित चाळकरयांच्या तोंडाला पुसली पाने विधान सभेतील आदेशाला प्रशासनाची केराची टोपली
कल्याण , कुणाल म्हात्रे  : कल्याण नजीकच्या बल्याणी, नांदप, बनेली या भागातून जाणार्या बडोदरा पुना महामार्गासाठी जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून या मार्गात या परिसरातील सुमारे २००० चाळी बाधित होत आहेत. या चाळकऱ्यानी १० ते १२ वर्षापूर्वी या परिसरातील चाळीत घरे खरेदी केली होती मात्र आता शासनाकडून या चाळकर्याना मोबदला देण्या ऐवजी जागा मालकांनाच घरटी मोब्दला दिला जात असल्याने चाळकरी हवालदिल झाले आहेत. आपल्या घराचा मोबदला आपल्याला मिळाला म्हणजे आपण घरे रिकामी करण्यास तयार असल्याचे त्याचे म्हणणे आहे.बल्याणी, बनेली परिसरातून जाणार्या बडोदरा पुणे या बहुचर्चित महामार्गासाठी जागा संपादन करण्यासाठी बाजारभावानुसार जमीन खरेदी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या सर्व्हेनुसार प्रत्येक चाळीतील घरासाठी ७ ते ८ लाख याप्रमाणे २८ कोटी २८ लाख रुपयाचा मोबदला ठरविण्यात आला आहे. या प्रकल्पात या परिसरातील सुमारे २००० चाळकरी बाधित होत असून या चाळकऱ्याना घरे रिकामी करण्यासाठी जागा मालकाकडून दबाब आणला जात आहे. मात्र प्रकल्पासाठी जाणार्या आपल्या घराचा शासनाकडून मोबदला दिल्यानंतरच आपण घरे सोडू अशी भूमिका घेतली आहे. मात्र तत्पूर्वीच कल्याण प्रांताधिकारी कार्यालयातून चाळकऱ्या ऐवजी जागा मालकालाच संपूर्ण मोबदला देण्यात आला आहे.आता जागामालक प्रत्येक चाळक्रयाला ३ ते ४ लाखांत बोळवण करत हाकलण्याच्या तयारीत आहे. मात्र ज्या घराची घरपट्टी आणि लाईटबिल आपल्या नावावर असताना आणि सर्व्हे मध्ये आपल्या नावाचा उल्लेख असताना आपलां मोबदला आपल्याला का देण्यात आला नाही असा रहिवाशाचा सवाल आहे. त्यातच २०१९ मध्ये याप्रकरणी विधानसभेत आमदार रवीद्र  फाटक, आमदार जगन्नाथ शिंदे यांनी मांडलेल्या लक्षवेधीत मोबदला थेट चाळकऱ्याना देण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष रामराजे निंबाळकर यांनी दिला होता. मात्र तरीही या आदेशाची पायमल्ली करत जागामालकाचे कल्याण करण्याचा घाट प्रांताधिकार्यांनी घातल्याचा आरोप स्थानिक नगरसेविका नमिता मयूर पाटील यांनी केला आहे. या चाळकऱ्याना त्यांच्या हक्काचा मोबदला द्या अन्यथा  त्यांच्या हक्कासाठी प्रांताधिकारी कार्यालयां समोर उपोषण छेडणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.दरम्यान जागेचा मोबदला लाटण्यासाठी चाळकरऱ्याच्या खोट्या सह्याचे निवेदन सादर करत सक्रीय झालेल्या दलालाच्या मदतीने जगामालाकानी हा मोबदला लाटला असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.तर याप्रकरणी प्रांताधिकारी अभिजित भांडे पाटील यांनी या चाळीची रजिस्टर नोदणी नसून केवळ नोटरी पद्धतीने नोदणी केलेली आहे. नोटरी ग्राह्य धरता येत नसल्याने आपण जागामालकाकडे मोबदला दिला असून जागामालकाकडून या रहिवाशांच्या पुर्नवसनासाठीचे हमीपत्र लिहून घेतले आहे. यामुळे जर जागामालक रहिवाशांची फसवणूक करत असेल तर रहिवाशांनी तक्रारी करावी, सदर जागामालकाला समोर सुनावणी घेत हा प्रश्न निकाली काढला जाईल असे सांगितले.मात्र नोटरी पद्धतीच्या चाळीतील घरासाठी चाळकऱ्याना मोबदला दिला जावा असे स्पष्ट आदेश विधानसभेचे असतानाही अधिकार्यांनी जागामालकाच्या हिताचा निर्णय घेतल्याने अशा अधिकार्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी नगरसेविका नमिता  पाटील यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. या प्रकल्पात आदिवासीची देखील जागा जात असून त्यांच्या अशिक्षित पणाचा फायदा घेत  या सर्व प्रकियेत मोठ्या प्रमाणात दलाल सक्रीय असून गोर गरीब आदिवासींची देखील फसवणूक केली जात आहे.

पुणे वडोदरा मार्गातील बाधित चाळकरयांच्या तोंडाला पुसली पाने विधान सभेतील आदेशाला प्रशासनाची केराची टोपली पुणे वडोदरा मार्गातील बाधित चाळकरयांच्या तोंडाला पुसली पाने विधान सभेतील आदेशाला प्रशासनाची केराची टोपली Reviewed by News1 Marathi on September 06, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads