Header AD

खासदार डाँ श्रीकांत शिंदे यांच्या कडून 'खारेगाव फाटक उड्डाण पुलाची' पाहणी



कळवा ,  अशोक घाग  :  कल्याणचे शिवसेनेचे खासदार डाँ श्रीकांत शिंदे यांनी शनिवार(ता 4)ला खारेगाव रेल्वे फाटक उड्डाण पुलाची पाहणी केली.खारेगाव मधून कळवा पूर्वेला जाण्यासाठी पूल नसल्याने येथील नागरिकांना जाण्या येण्यासाठी खारेगाव रेल्वे ओलांडून जावे लागते लोकल येण्याआधी फाटक बंद केल्यावर अनेक वाहनांचा खोळंबा होत आहे तसेच  रुळ ओलांडताना आता पर्यंत अनेक नागरिकांचा बळी गेला आहे. 



         वाहनचलकांची व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे फाटकावर ठाणे महापालिका व मध्ये रेल्वेच्या वतीने उड्डाणपुल उभारण्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू असून ते अतिशय संथगतीने सुरू असल्याने नागरिक व वाहनचालक यांची सध्या फरफट सुरू आहे त्यामुळे सोशल मीडियावर रेल्वे व महापालिकेच्या कामावर सध्या टीका सुरू आहे हे काम पूर्ण झाल्यावर रेल्वेची क्रॉसिंग बंद होऊन कल्याण व ठाण्याकडे जाणाऱ्या लोकलचा खोळंबा दूर होणार आहे रेल्वेचा प्रवास जलद होऊन रेल्वेच्या फेऱ्यामध्ये वाढ होणार असल्याने या पुलाचे काम लवकर पूर्ण होऊन येथील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी खासदार शिंदे यांनी शनिवारी या कामाची पाहणी केली.




          या वेळी महापौर नरेश म्हस्के,स्थानिक नगरसेवक उमेश नगरसेविका अनिता गौरी, नगरसेविका विजया लासे माजी उपमहापौर मनोज लासे, खारीगाव विभाग प्रमुख नंदकुमार पाटील कळवा विभाग प्रमुख विजय शिंदे राकेश पाटील कांचन सिंग व रेल्वेचे अधिकारी, उपस्थित होते या वेळी खासदारांनी हे काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या तसेच या वेळी खासदार शिंदे यांनी कळवा व मुंब्रा दरम्यान मध्ये रेल्वेच्या वतीने टाकण्यात येत असलेल्या पाचव्या व सहाव्या मार्गीकेच्या कामाचीही पाहणी केली.   " या उड्डाणपुलाचे काम शेवटच्या टप्प्यात सुरू असून येत्या दीड महिन्यात हे काम पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला होईल"   डाँ श्रीकांत शिंदे,खासदार कल्याण,   
खासदार डाँ श्रीकांत शिंदे यांच्या कडून 'खारेगाव फाटक उड्डाण पुलाची' पाहणी खासदार डाँ श्रीकांत शिंदे यांच्या कडून 'खारेगाव फाटक उड्डाण पुलाची' पाहणी Reviewed by News1 Marathi on September 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads