Header AD

कराटे खेळात टिटवाळयातील खेळाडूंनी संपादन केला ब्लॅक बेल्ट




कल्याण , कुणाल  म्हात्रे   : किमुरा शुकोकाई कराटे असोसिएशन (इंडिया) यांच्या वतीने मोहन मार्शल आर्ट्स आणि फिटनेस प्लॅनेटखडकपाडाकल्याण येथे रविवारी कराटे या खेळात ब्लॅक बेल्ट परीक्षा आयोजीत करण्यात आली होती. कल्याणडोंबिवलीकोनगाव आणी टिटवाळा येतील २२ कराटेपटू या परीक्षेत सहभागी झाले होते.



टिटवाळा येथील विनायक मार्शल आर्ट्स आणि फिटनेस झोन येथे मुख्य प्रशिक्षक विनायक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत असलेल्या ७ कराटे खेळाडू मृण्मयी भोजनेभुषण जाधवसंदेश देवरेमधुरा सुपलयश राठोडराजरत्न साळवे आणि गणेश रायते या परीक्षेत सहभागी झाले होते. सर्व खेळाडूंना गेल्या ३ ते ४ वर्षात कराटे या खेळात संपादन केलेले सर्व कौशल्ये याचे प्रात्यक्षिक तसेच विविध शारीरिक आणि मानसिक चाचण्या मध्ये स्वतःला सिद्ध करावे लागते. 



या सर्व चाचण्या यशस्वी रित्या पूर्ण करुन टिटवाळ्यातील खेळाडूंनी प्रथम प्रयत्नात ब्लॅक बेल्ट संपादन केला. या परिक्षेसाठी राज्य युवा पुरस्कार विजेते व मुख्य कराटे प्रशिक्षक विनायक कोळीहरीष वायदंडे आणि गौरी तीटमे हे प्रशिक्षक खेळाडूंसोबत उपस्थित होते.किमुरा शुकोकाई कराटे असोसिएशन इंडियाचे अध्यक्ष व मुख्य प्रशिक्षक मोहन सिंग  यांनी सर्व खेळाडूंची परीक्षा घेतली व या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व खेळाडूंची यादी जाहीर केली. या ७ ब्लॅक बेल्ट खेळाडूंमुळे टिटवाळयाच्या क्रीडा विश्वात आणखी भर पडली आहे.

कराटे खेळात टिटवाळयातील खेळाडूंनी संपादन केला ब्लॅक बेल्ट कराटे खेळात टिटवाळयातील खेळाडूंनी संपादन केला ब्लॅक बेल्ट Reviewed by News1 Marathi on September 27, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी शहरातील वंजारपट्टी उड्डाण पुलाचे डॉ ए पी जे अब्दुल कलाम नामकरण संपन्न

भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए च्या माध्यमातून वंजारपट्टी नाका येथे 2016 मध्ये उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे ना...

Post AD

home ads