Header AD

डोंबिवलीत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

 डोंबिवली ( शंकर जाधव ) राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कल्याण जिल्हा सरचिटणीस रोहित सामंत यांच्या डोंबिवली पुर्वेकडील राजाजी पथ येथील रामनगर पोलीस ठाणे जवळील अवधूत चिंतन येथील कार्यालयाचे उद्घाटन रविवारी ५ तारखेला सायंकाळी ५ वाजता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी माजी खासदार आनंद परांजपे, उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रवक्ता महेश तपासे, सरचिटणीस रमेश हनुमंते, शानू पाठण,कल्याण –डोंबिवली जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, कार्याध्यक्ष डॉ. वंडार पाटील, डोंबिवली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुरेश जोशी यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.          आव्हाड यांनी ठाणे येथे सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या झालेल्या हल्ल्याबाबत प्रशासनावर तशोरे ओढले होते.एरवी डोंबिवली स्टेशनपरिसर फेरीवाल्यांनी गजबलेल्या असतो. मात्र गृहनिर्माण मंत्री आव्हाड येत असल्याने स्टेशनपरिसर फेरीवाला मुक्त दिसेल का असा प्रश्न पालिकेचे `ग`प्रभाग क्षेत्र अधिकारी रत्नप्रभा कांबळे यांना डोंबिवलीकर उपस्थित केला आहे. गृहनिर्माण मंत्री आव्हाड या कार्यक्रमात पुन्हा फेरीवाला प्रश्नाबाबत प्रशासनाला धारेवर धरतील का राजकीय भाष्य करतील असा प्रश्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.

डोंबिवलीत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड डोंबिवलीत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड Reviewed by News1 Marathi on September 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads