Header AD

ठाण्यात काँग्रेसच्या वतीने ठीक ठीकाणी खड्डे भरो आंदोलन
ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे शहरातील विविध ठीकाणी रस्त्याची झालेली दुर्दशा विविध माध्यमातून प्रसिद्ध होत असताना ठाण्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी ठाण्यातील विविध भागात एकत्र येत खड्डे भरो आंदोलन केले.         ठाण्यातील रस्त्यावरील खड्ड्यांची छायाचित्रे विविध माध्यमावर प्रसिद्ध झाल्यानंतर ठाण्यातील काँग्रेस पदाधिका-यानी शहरातील प्रमुख रस्त्यांची पाहणी केली व जिल्हाध्यक्ष अॅड विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या रस्त्यावरील खड्डे बुजवून आंदोलन केले,नौपाडा,वर्तकनगर,घोडबंदर रोड,ठाणे शहर,कळवा,मुंब्रा,कोपरी ,पारसिक नगर,वागले इस्टेट आदी परिसरातील खड्डे बुजवून काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठाणे महापालिका प्रशासनाचा निषेध केला.          ठाणे शहरात जिल्हा काँग्रेस सरचिटणीस सचिन शिंदे,ब्लाॅकअध्यक्ष संदिप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्बेडकर रोड येथील खड्डे बुजवून निषेध नोंदविला या प्रसंगी धर्मवीर मेहरोल,प्रकाश मांडवकर,बाबू यादव,अफजल तलवलकर,स॔जय घाग,अॅड जावेद शेख,अक्रम बन्नेखान,मनोज पांडे, भारती जाधव,प्रविण खेरालिया आदि पदाधिकारी उपस्थित होते .        तर वर्तक नगर येथे काँग्रेस जिल्हाध्यक्ष अॅड विक्रांत चव्हाण व ब्लाॅकअध्यक्ष आनद सांगळे,यांच्या नेतृत्वाखाली खड्डे भरो आंदोलन करण्यात आले,नौपाडा येथेही काँग्रेस नेते रविंद्र आंग्रे,शेखर पाटील व ब्लाॅकअध्यक्ष संतोष जोशी,जयेश परमार यांच्या नेतृत्वाखाली खड्डे भरो आंदोलन करण्यात आले.            सावरकर नगर येथे हिन्दुराव गळवे,ब्लाॅकअध्यक्ष राजू हैबती यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले तर कोपरी येथे भालचंद्र महाडिक,निलेश अहिरे यांच्या नेतृत्वाखाली खड्डे भरो आंदोलन करण्यात आले. ठाण्यातील वागले इस्टेट येथे काँग्रेस नेते अंजनी सिंग व सरचिटणीस मंझूर खत्री व इतर पदाधिकाऱ्यांकडून खड्डे बुजविण्यात आले, मुंब्रा येथेही अनिल भगत,भोलेनाथ पाटील,संजय शिदे यांच्या मार्गदर्शनाखाली खड्डे भरो आंदोलन करण्यात आले.       या प्रसंगी बोलताना शहर काॅग्रेस प्रवक्ते सचिन शिंदे यांनी सागितले की,या वर्षी ठाण्यात चांगला पाऊस झाल्यामुळे ठीक ठीकाण प्रमुख हमरस्त्यावर खड्याचे जाते पसरले आहे,सध्या गणपतीचे दिवस चालू आहे गणेशोत्सवापूर्वी पासून काँग्रेस अध्यक्ष अॅड.विक्रांत चव्हाण यांनी या रस्त्यावरील खड्ड्या बाबत वारवार निदर्शनास आणून देखील याची डागडुजी करण्यात आली नाही.            आज पाच दिवसाचे गणपतीचे विसर्जन असून अजूनही या बाबत आवश्यक ती पाउले न उचलल्यामुळे नाईलाजास्तव हे प्रतिकात्मक आदोलन संपूर्ण ठाण्यात करण्यात आले आहे काही दिवसांतच 10 दिवसांचे गणपतीचे विसर्जन आहे तत्पूर्वीच हे खड्डे ठाणे महानगर पालिकेकडून बुजविण्यात आले नाही तर यापेक्षाही तीव्र आदोलन घेडण्यात येईल असा इशाराच त्यांनी शेवटी दिला.

ठाण्यात काँग्रेसच्या वतीने ठीक ठीकाणी खड्डे भरो आंदोलन ठाण्यात काँग्रेसच्या वतीने ठीक ठीकाणी खड्डे भरो आंदोलन Reviewed by News1 Marathi on September 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads