Header AD

मैजिकल आशा - ब्रम्हांड कट्ट्याची आशाजिंना मानवंदना.ठाणे, प्रतिनिधी  :  सहा दशकांपेक्षाही जास्त ज्यांचा गायनप्रवास आहे. अनेकानेक भाषेतील सहस्त्रावधी विविध गीतं ज्यांनी लीलया गायली आहेत. गीत, गजल, भजन, लावणी, कव्वाली, विरहगीत, लोकगीत, भावगीत, बालगीत, प्रेमगीत, इंडियन, वेस्टर्न, क्लासिकल अशा गायनाच्या एकुण एक प्रांतात ज्यांनी अगदी सहज मुशाफिरी केली आहे आणि ज्यांना महाराष्ट्र भुषण या आपल्या राज्याच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे अशा संगीत क्षेत्रातील गुरुसमान विदुषीला म्हणजेच द ग्रेट आशा भोसले यांना शिक्षकदिनाचे औचित्य साधून ब्रम्हांड संगीत कट्ट्याने मानवंदना दिली.          कोरोना निर्बंध आणि नियमांचे काटेकोर पालन करत लॉकडाऊन  काळातही फेसबुक आणि यू ट्यूब लाइवच्या माध्यमातून ब्रम्हांड संगीत कट्ट्याने आपली मनोरंजनाची परंपरा अखंड चालू ठेवली आहे. अनेक दर्जेदार कार्यक्रम कट्ट्याच्या कलाकारांनी सादर केले. *मैजिकल आशा* हा त्यापैकीच एक.          मनिषा ठाणेकर, कविता सपकाळे आणि चैताली गोवेकर या त्रिवेणीने आशाजींची एकाहून एक सुंदर गाणी तन्मयतेने, समरसून सादर केली. आशाजिंचा नजाकतीने भारलेला स्वर मनिषाजिंच्या गळ्यातून अगदी अलगद उतरला. तर त्यांचा नटखट, चुलबूला अंदाज कविताजिंनी छान पेश केला. आणि त्यांचा शोख शायराना भाव चैतालीजींच्या गायनातून सुंदररित्या प्रकटला. या त्रिवेणीला युगलगीतांमध्ये तितकीच समर्पक साथ केली कट्ट्याचे प्रतिथयश गायक जयंत घेगडमल आणि अजय अंबोरे यांनी.             मागे उभा मंगेश, जांभूळ पिकल्या झाडाखाली, आणि बाई मी पतंग उडवीत होते ही अवीट गोडीची   मराठी गाणी तसेच *भिनि भिनि भोर  सजना है मुझे, कहीं आग लगे लग जावे, ये क्या जगह है दोस्तो ही सोलो गीतं आणि *हम दोनो मिलके, क्या देखते हो, तू रुठा तो मै रो दुंगी,  सोनी मेरी सोनी, इश्क मेरा बन्दगी है ही युगलगीतं व है अगर दुश्मन दुश्मन ही धडाकेबाज कव्वाली अशी एकापेक्षा एक सुपरहीट गाणी या मैजिकल आशा मध्ये सादर करण्यात आली. देशात आणि परदेशातही ऑनलाइन श्रोत्यांनी त्यांचा मनमुराद आनंद लुटला.        पण या मैजिकल आशा चं खरं मैजिक होतं ते त्या कार्यक्रमाच्या निवेदनात. जगप्रसिद्ध जादूगार इंद्रजित यांच्या कन्या मधुगंधा इंद्रजित यांनी या मैजिकल कार्यक्रमाच एकदम भारी जादूई निवेदन केलं. आशाजींचे अनेक किस्से त्यांनी सांगितले आणि थोडक्यात त्यांचा जिवन परिचयही दिला. देखणं आणि खुमासदार अस त्यांचं निवेदन झालं.


      

        कार्यक्रमाच्या सुरुवातीला ब्रम्हांड कट्ट्याचे संस्थापक लोकप्रीय श्री राजेशजी जाधव आणि कट्ट्याचे प्रेरणास्त्रोत्र अध्यक्ष श्री अरुण दळवी  यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. तिनही गायिकांनी सादर केलेल्या एका धमाकेदार मेडलीने या  मैजिकल आशा ची सांगता झाली 

मैजिकल आशा - ब्रम्हांड कट्ट्याची आशाजिंना मानवंदना. मैजिकल आशा - ब्रम्हांड कट्ट्याची आशाजिंना मानवंदना. Reviewed by News1 Marathi on September 06, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads