Header AD

भिवंडीत एक मजली इमारत कोसळली , एकाचा मृत्यू तर सात जण जखमी...भिवंडी दि 3 (प्रतिनिधी ) शहरातील आजमी नगर येथील  टिपू सुलतान चौक परिसरात असलेली एक मजली इमारत कोसळल्याची घटना शुक्रवारी सकाळी   घडली आहे. या दुर्घटनेत एक जणाचा मृत्यू तर आठ जण जखमी झाले आहेत.   रजाक ( वय अंदाजे ३५ ते ४० वर्ष ) असे दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. तर हसीम शेख ३५, सुबेदा खातून ३५ , अमिना अन्सारी ४५ , रोशन बानो ३०, जारा कलाम १२, रोजी फातिमा १४, जिकरा अन्सारी १४ अशी जखमींचीनावे आहेत.        शहरातील आजमी नगर येथील  टिपू सुलतान चौक परिसरात शब्बीर अंसारी यांचे राहते घर होते. मार्केट परिसरात असलेल्या या घराच्या आजू बाजूला शब्बीर यांनी घराच्या गेलेरिवर वाढीव अधिकृत बांधकाम केले होते. या इमारतीच्या खाली किराणा दुकान तसेच इतर दुकाने होती. मार्केट परिसर व दुकाने असल्याने याठिकाणी नागरिक खरेदीसाठी आले होते. त्यावेळी वाढीव गेलेरी व घराचा भाग खरेदी साठी आलेल्या नागरिकांवर कोसळल्याने या दुर्घटनेत एकाचा   मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत.           विशेष म्हणजे या दुर्घटनेत घरातील कोणीही जखमी झाले  नसून मार्केट व दुकानात खरेदीसाठी आलेला  नागरिक  या  दुर्घटनेत मयत झाला तर महिला, नागरिक जखमी झाले आहेत. जखमींना शहरातील स्व इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये तिघांची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी अग्निशमन दल , पोलीस व आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक दाखल होऊन  मदत कार्य सुरू होते. भोईवाडा पोलीस ठाण्यात या दुर्घटनेची नोंद करण्यात आली आहे...

भिवंडीत एक मजली इमारत कोसळली , एकाचा मृत्यू तर सात जण जखमी... भिवंडीत एक मजली इमारत कोसळली , एकाचा मृत्यू तर सात जण जखमी... Reviewed by News1 Marathi on September 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads