Header AD

शिवसेना विभाग प्रमुख नकुल गायकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे पालक मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : शिवसेना प्रभाग क्र. १०९ गोळवली विभाग प्रमुख नकुल गायकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे हे देखील उपस्थित होते. याच वेळी नकुल गायकर यांच्या कार्य अवहाल पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले.नकुल गायकर यांनी गोळवली विभागात विविध समाजोपयोगी कामे केली आहेत. याचाच हा कार्य अहवाल प्रकाशन सोहळा देखील उद्घाटना वेळेस पार पडला. विभाग प्रमुख नकुल गायकर यांनी प्रभागातील नागरिकांसाठी नागरिकांची आरोग्याची काळजी घेता आयुष्य भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अर्थात पाच लाख रुपया पर्यंत मोफत उपचारप्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आदी शासन कृती योजना शिबिरे लावली. तसेच माणसाच्या जीवनात लागणारे महत्त्वाची कागदपत्रे अर्थात प्रत्येक शासकीय कामात अनिवार्य ठरणारे आधार कार्ड, पॅन कार्ड शिबिर आयोजित केले.कोव्हिड या जीवघेण्या महामारीचा  काळात वेळोवेळी लॉक डाऊन झाले. या परिस्थितीत लोकांचे खूप हाल झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नकुल गायकर यांनी गोरगरिबांना धान्य वाटप तसेच आर्थिक मदत देखील केली. 

शिवसेना विभाग प्रमुख नकुल गायकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे पालक मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन शिवसेना विभाग प्रमुख नकुल गायकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे पालक मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन Reviewed by News1 Marathi on September 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads