Header AD

कोकणातील घरे उभारण्यास काँग्रेसची मदत रवाना
ठाणे , प्रतिनिधी  :  कोकणात पूरग्रस्त भागातील बाधित कुठुबियांना सर्वच स्तरातून मदत पोहचत असताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार ठाण्यातील काँग्रेसने कोकणातील वाहून गेलेली घरे उभारण्याकरिता आवश्यक सामुग्री  पाठवली आहे.


             ठाणे शहर(जिल्हा)काॅग्रेस च्या वतीने जिल्हाध्यक्ष अॅड विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणातील वाहून गेलेली घरे उभारण्याकरिता आवश्यक अशी सामुग्री आज ठाण्यातून रवाना करण्यात आली शहर काॅग्रेसचे जेष्ठ उपाध्यक्ष भालचंद्र महाडिक यांच्या हस्ते झेंडा दाखविण्यात आला या प्रसंगी काँग्रेस सरचिटणीस व प्रवक्ते सचिन शिंदे,रमेश इंदिसे,महेंद्र म्हात्रे,बाबा शिंदे,ब्लाॅकअध्यक्ष संदिप शिंदे,सरचिटणीस मंझूर खत्री,सुभाष ठोंबरे,अॅड हिदायत मुकादम,रेखा मिरजकर,गोपाळ सांवत,अनवर साठी आदि पदाधिकारी उपस्थित होते.              याप्रसंगी बोलताना काँग्रेस प्रवक्ते सचिन शिंदे यांनी सांगितले की,कोकणातील अतिवृष्टीत सर्वस्व गमावलेल्या कोकणवासियाना सर्वच स्तरातून मदत मिळत असताना त्यांना त्यांची घरे उभारण्याकरिता विविध अडचणी येत आहेत,हिच गरज ओळखून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नानासाहेब पटोले यांनी ठाण्यातील काँग्रेसला घरे उभारण्याकरिता आवश्यक असलेले सामान पाठवण्याकरिता सूचना दिल्या होत्या.       त्याच अनुषंगाने आम्ही पत्रे,शेडचे सामान,खुर्ची,टेबल,चटया अशा प्रकारचे साहित्य आज ठाण्यातून रवाना करत असून कोकण पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्याकरिता काँग्रेसच्या मदत केंद्रामार्फत हे सर्व साहित्य गरजवंत कोकणवासियांना पोहोचवणार आहोत अजूनही गरज असेल तर काही साहित्य लवकरच पाठवण्यात येईल असे सचिन शिंदे यांनी बोलताना शेवटी सांगितले.

                              

कोकणातील घरे उभारण्यास काँग्रेसची मदत रवाना कोकणातील घरे उभारण्यास काँग्रेसची मदत रवाना Reviewed by News1 Marathi on September 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads