Header AD

बीएसयूपीच्या घरांचा ताबा मिळवण्यासाठी दिव्यांगांनी केले कायदेभंग आंदोलन
ठाणे (प्रतिनिधी) -  दीड वर्षांपूर्वी सोडत काढून पात्र दिव्यांगांना बीएसयूपीची घरे देण्यासाठी ताबापत्र ठामपाच्या वतीने देण्यात आली आहेत. मात्र, या घरांचा प्रत्यक्ष ताबा अद्यापही  देण्यात आलेला नाही.  घरांचा ताबा मिळावा, यासाठी दिव्यांगांनी आंदोलन करूनही कार्यवाही होत नसल्याने बृहन्महाराष्ट्र दिव्यांग विकास कामगार संघटना संचालित अखिल भारतीय दिव्यांग सेनेच्या वतीने ठामपा मुख्यालयाबाहेर कायदेभंग आंदोलन केले.            दरम्यान, आयुक्तांनी भेट देऊनही निर्णय घेण्याऐवजी केवळ पोकळ आश्वासन दिले असल्यानेच हे आंदोलन करण्यात आले असल्याचे मोहम्मद युसूफ मोहम्मद फारुख खान यांनी सांगितले. पोलिसांनी सर्व आंदोलकांना अटक करून सोडून दिले.          दिव्यांगांना बीएसयूपी योजनेतून परवडणारी घरे देण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. या अर्जांमधून 4 फेब्रुवारी 2020 रोजी पात्र- अपात्र निश्चित करून 6 फेब्रुवारी 2020 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात दिव्यांगांना चाव्या देण्याचा सोपस्कार पार पाडण्यात आला होता. या कार्यक्रमानंतर सुमारे दीड वर्षांनंतरही काही अपवाद वगळता बहुतांश दिव्यांगांना घरांचा प्रत्यक्ष ताबा देण्यात आलेला नाही.           विशेष म्हणजे , या घरांचा ताबा घेण्यासाठी अनेक दिव्यांगांनी आपल्या भाडेतत्त्वावरील घरांची अनामत रक्कम घेऊन पालिकेत जमादेखील केली आहे. मात्र, बीएसयूपी कक्ष स्थावर मालमत्ता विभागाकडे तर स्थावर मालमत्ता विभाग बीएसयूपी कक्षाकडे जबाबदारी ढकलत आहे. माहिती अधिकारातही दिवा, तुळशीधाम, कासारवडवली, ब्रम्हांड, रिव्हरवूड येथील घरांचा प्रत्यक्ष ताबा देण्यात आला नसल्याची माहिती देण्यात आली आहे.             या घरांचा ताबा मिळावा, यासाठी 12 जुलै रोजी दिव्यांगांनी पालिका  मुख्यालयासमोर भर पावसात धरणे आंदोलनही केले होते. त्यावेळेस हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, दीड महिन्यात दिव्यांगांना घरांचा ताबा देण्यात आलेला नाही. त्यामुळे पालिका मुख्यालयात घुसून हे आंदोलन करण्यात येणार होते.

 


              या आंदोलनासाठी ठामपा मुख्यालयाबाहेर मोठ्या संख्येने दिव्यांगांनी गर्दी केली होती. त्यामुळे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिव्यांगांना भेटीसाठी बोलावले. मात्र, या भेटीमध्ये आयुक्तांनी, पुढील 20 दिवसानंतर घरांचा ताबा देण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन दिले. त्यावर दिव्यांगांनी, या आधीही अशीच आश्वासने दिली आहेत.               मात्र, त्याची पूर्तता न केल्याने ठामपाने लेखी स्वरुपात आश्वासन द्यावे, अशी मागणी केली. ही मागणी फेटाळून लावल्याने सर्व दिव्यांगांनी पोलिसांचा मनाई आदेश धुडकावून पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरच आंदोलन केले. पोलिसांनी सर्व आंदोलकांना अटक करून सोडून दिले.

बीएसयूपीच्या घरांचा ताबा मिळवण्यासाठी दिव्यांगांनी केले कायदेभंग आंदोलन बीएसयूपीच्या घरांचा ताबा मिळवण्यासाठी दिव्यांगांनी केले कायदेभंग आंदोलन Reviewed by News1 Marathi on September 08, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads