Header AD

काँग्रेसने शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला अनंत गीते यांचा शरद पवार यांच्या वरील आरोप चूकीचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे स्पष्टीकरण


■तर उलट सुलट आरोप करत संजय राऊत यांनी वेळ वाया घालवू नये राज्याच्या विकासाकडे लक्ष देण्याचा आठवले यांचा सल्ला...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  शरद पवार यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपला होताअसं विधान शिवसेना नेते अनंत गीते यांनी केलं होतं. त्याला रिपाइं नेते रामदास आठवले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवारांनी काँग्रेसच्या पाठित खंजीर खुपसला नाही. तर काँग्रेसनेच पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला होताअसा दावा रामदास आठवले यांनी केला आहे. पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या बैठकीनिमित्ताने ते कल्याणमध्ये होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हे विधान केलं. शिवसेना नेते अनंत गिते यांच्या टीकेवरही आठवलेंनी प्रतिक्रिया दिली. १९९८ मध्ये मी शरद पवार यांच्यासोबत होतो. शरद पवार यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. काँग्रेसने शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे गीते यांचा आरोप चूकीचा आहेअसे आठवले म्हणाले. शरद पवारांवर इतका गंभीर आरोप केला आहे तर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहू नये. शिवसेनेने पुन्हा एकदा स्वगृही परतत भाजपाआरपीआयसोबत मिळून बाळासाहेबांचं शिवशक्ती भिमशक्ती स्वप्न साकार केलं पाहिजेअसंही त्यांनी सांगितलं.
संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात सव्वा रूपयाचा माणहणीचा दावा करणार त्यांची तेव्हढीच किंमत असल्याची टीका केली. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर देताना त्यांनी सव्वा रुपयाऐवजी ही रक्कम वाढवायला हवी. संजय राऊतांची मानहानी सव्वा रुपयांची नक्कीच नाही असा टोमणा मारला. राज्यात सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपाबाबत बोलताना रामदास आठवले यांनी सध्या उलट सुलट आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत त्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहेसंजय राऊत सत्ताधारी पक्षाचे खासदार आहेत, शिवसेनेचे प्रवक्ते ,नेते आहेत त्यांना अशा प्रकारचे आरोप करत वेळ खर्च करण्याची आवश्यकता नाही अस सल्ला राऊत याना दिला.महाविकास आघडीच्या सरकारमध्ये आपापसात आरोप सुरू आहेत, किरीट सोमय्या यांनी अनेक लोकांच्या अनियमितता भ्रष्टाचार बाबत तक्रार करत ईडी ला पुरावे दिले आहेत, साखर कारखाने व इतर उद्योग करायला काही हरकत नाही मात्र त्यात भ्रष्टाचार, अनियमितता असता कामा नये अस स्पष्ट केले तर किरीट सोमय्या यांनी आरोप केलेले बहुतेक आमदार मंत्री भाजप मध्ये गेलेत याबाबत बोलताना रामदास आठवले यांनी असे आमदार मंत्री भाजप मध्ये आले असतील तर इतरांनी जर त्यांचे  पुरावे असतील  बाहेर काढावेत अस आवाहन विरोधी पक्षांना केलं.

काँग्रेसने शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला अनंत गीते यांचा शरद पवार यांच्या वरील आरोप चूकीचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे स्पष्टीकरण काँग्रेसने शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला अनंत गीते यांचा शरद पवार यांच्या वरील आरोप चूकीचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे स्पष्टीकरण Reviewed by News1 Marathi on September 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडी शहरातील वंजारपट्टी उड्डाण पुलाचे डॉ ए पी जे अब्दुल कलाम नामकरण संपन्न

भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए च्या माध्यमातून वंजारपट्टी नाका येथे 2016 मध्ये उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे ना...

Post AD

home ads