Header AD

कल्याण स्टेशन परिसरातील बेशिस्त व मुजोर रिक्षा चालकांवर वाहतुक पोलीस व आरटीओची कारवाई ६०० रिक्षांची तपासणी, ९० रिक्षावर दंडात्मक कारवाई
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात बेशिस्तबेताल रिक्षाचालकामुळे वाहन चालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होतं. विना परमिट, विना परवाना, विना गणवेश रिक्षा चालवू नका असे आवाहन करीत वाहतूक पोलिसांनी रिक्षा चालकांना १० दिवसांचा अलटीमेटम देत कारवाईचा इशारा दिला होता. अखेर मंगळवार पासून कल्याण शहर वाहतूक पोलिस आणि आरटीओच्या संयुक्त विद्यमाने रिक्षाचालकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली.स्टेशन परिसरात वाहतूक कोंडी करीत रस्ता अडविणाऱ्या विना परवाना, विना गणवेश आणि बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारत तब्बल ६०० रिक्षा तपासत ९० रिक्षावर दंडात्मक कारवाई  करण्यात आल्याने नियमबाह्य वागणाऱ्या रिक्षा चालकांचे धाबे दणाणले आहे.         


                 

याबाबत उपप्रादेशिक आधिकारी कल्याण तानाजी चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता रिक्क्षा चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करीत स्टँडमध्ये रिक्षा रांगेत लावल्या पाहिजेत प्रवाशांनी देखील रांगेत उभे राहून रिक्षा सेवा घेतली पाहिजे असे सांगितले. तर रिक्षा चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे जेणेकरुन कारवाईला सामोरे जाण्याची वेळ येणार नाही अशी प्रतिकिया वाहतूक शाखा कल्याण पोलिस निरीक्षक सुखदेव पाटील यांनी दिली.

कल्याण स्टेशन परिसरातील बेशिस्त व मुजोर रिक्षा चालकांवर वाहतुक पोलीस व आरटीओची कारवाई ६०० रिक्षांची तपासणी, ९० रिक्षावर दंडात्मक कारवाई कल्याण स्टेशन परिसरातील बेशिस्त व मुजोर रिक्षा चालकांवर वाहतुक पोलीस व आरटीओची कारवाई ६०० रिक्षांची तपासणी, ९० रिक्षावर दंडात्मक कारवाई Reviewed by News1 Marathi on September 02, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads