Header AD

विनोद शेलकर राष्ट्रीय भारतज्योती श्री गुरु राष्ट्र सन्मान पुरस्कार २०२१ ने स्नमानित


■सह्रदयतेने शैक्षणिकसामाजिकवंचितांसाठी केलेल्या कामाचा गौरव..


कल्याण ,  कुणाल  म्हात्रे :  राष्ट्रीय शिक्षक दिनाचे औचित्य साधून एमव्हीएलए ट्रस्ट हैद्राबादच्या प्रेरणादायी दूरदर्शी अग्रणी पुरस्कार  गुरु सन्मान पुरस्कार २०२१ साठी एमव्हीएलए ट्रस्ट हैद्राबाद कडून विनोद शेलकर यांना नामांकन देण्यात आले होते.       कोरोना प्रादुर्भावामुळे रविवारी ऑनलाईन पद्धतीने या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. हा पुरस्कार राष्ट्रीय स्तरावर देण्यात आला. शिक्षक दिन गुरु सन्मान पुरस्कार  साठी करंडकपदकप्रमाणपत्र आणि सन्मान आशा चार गोष्टींचा समावेश आहे. संपूर्ण भारतातून शैक्षणिकसामाजिक क्षेत्रामध्ये अभूतपूर्व,  कल्याणकारीसमाजुपयोगी काम करणाऱ्या शिक्षकांचासंस्थाचालकांचासस्थांचा यावेळी विविध पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यात महाराष्ट्रजम्मू काश्मीरतेलंगानातामिळनाडूकर्नाटकउत्तरप्रदेशमध्यप्रदेशआंध्रप्रदेशहिमाचल प्रदेशउत्तराखंडपंजाबझारखंडआसामराजस्थान अशा विविध राज्यातील शिक्षकांचा समावेश होता.            महाराष्ट्रातून  विनोद लक्ष्मण शेलकर यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. विनोद शेलकर हे गुरुनानक इंग्लिश हायस्कूल आणि ज्यू कॉलेज कल्याण येथे कलाशिक्षक असून आता पर्यंत शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांची एकूण २० वर्ष सेवा झाली आहे.  गेल्या दहा वर्षापासून आविष्कार एज्युकेअर फाउंडेशनच्या माध्यमातून वंचितांसाठीअनाथआदिवासी मुलांसाठीत्याच्या प्रगतीसाठी काम करत आहेत. या सोबतच पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक वर्षी इको फ्रेंडली गणेशा मेकिंग कार्यशाळेचे आयोजन ते करत असतात.            ज्यात प्रत्येक वर्षी २५० ते ३०० विविध शाळांमधील विद्यार्थी प्रत्यक्ष रित्या सहभाग नोंदवतात. यावर्षी कोरोनामुळे ऑनलाईन पद्धतीने जागतिक स्तरावर या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात ११९४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. आविष्कार फाउंडेशनच्या माध्यमातून पर्यावरण पूरक गणेशोत्सवात कसा साजरा करावाघरीच गणेशाचे विसर्जन कसे करावे याचेही मार्गदर्शन केले जाते.त्यांच्या या यशाबददल मुख्याध्यापिका बलजित कौर मारवाहपर्यवेक्षिका अर्चना तिवारीआविष्कारचे अध्यक्ष सचिन जाधवखजिनदार गिरीश मंजुळे आणि टीमउत्तर महाराष्ट्र विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटीलभाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सह संयोजक अनिल बोरनारे,  कोकण विभाग संयोजक एन.एम. भामरेकल्याण जिल्हा संयोजक सुभाष सरोदेमजी तहसीलदार आर. जी. चव्हाण आदींसह सर्व स्तरातून त्यांचे अभिंदन केले जात आहे.

विनोद शेलकर राष्ट्रीय भारतज्योती श्री गुरु राष्ट्र सन्मान पुरस्कार २०२१ ने स्नमानित विनोद शेलकर राष्ट्रीय भारतज्योती श्री गुरु राष्ट्र सन्मान पुरस्कार २०२१ ने स्नमानित Reviewed by News1 Marathi on September 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads