Header AD

अखेर कोपर पुलाच्या लोकापर्णाची तारीख ठरली...

 डोंबिवली ( शंकर जाधव ) १८ सप्टेंबर २०१८ रोजी कोपर पुलाचा दुरुस्तीसाठी रेल्वे प्रशासनाने वाहतुकीसाठी बंद केला होता.लॉकडाऊन मध्ये या पुलाचे काम युद्धपातळीवर सुरु होते. कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याने या पुलाचे काम पूर्ण झाले आहे.उपजिल्हाप्रमुख राजेश कदम,उपशहरप्रमुख संतोष चव्हाण,विवेक खामकर,उपविभाग प्रमुख प्रथमेश खरात यांनी काही दिवसांपूर्वी पुलाच्या कामाची पाहणी केली होती.गणेशोत्सवाचा आधी कोपर पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल असे आश्वासन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले. खासदा डॉ शिंदे यांनी जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण केले असून येत्या ७ तारखेला कोपर पुल वाहतुकीसाठी खुला होणार आहे.          याबाबत खासदार डॉ, श्रीकांत शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, कोपर पुलाचे कामाच्या पाहणीकडे शिवसेनेचे लक्ष होते. लॉकडाऊनध्ये या कामाला अधिक गती मिळाली होती.हा पूल जनतेसाठी लवकरात लवकर सुरु करावा यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरु होते. येत्या ७ तारखेला कोपर पुल वाहतुकीसाठी खुला होणार आहे.तर स्थायी समितीचे माजी सभापती तथा माजी ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे म्हणाले, कोपर पुलासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी खूप पाठपुरावा केला आणि खूप कमी कालावधीत तो पूर्ण होत आहे.         यापूर्वी जोशी हायस्कूल उड्डाणपूलमुळे डोंबिवली पश्चिम लोकांना कोविड काळात त्याचा खूप उपयोग झाला. त्यासाठी खासदारांनी खूप मेहनत घेतली. कोपर पुलामुळे आता वाहतूक कोंडी होणार नाही. मुख्य म्हणजे आता दोन्ही उड्डाणपूलामुळे वाहतूक कोंडी होणार नाही. 

अखेर कोपर पुलाच्या लोकापर्णाची तारीख ठरली... अखेर कोपर पुलाच्या लोकापर्णाची तारीख ठरली... Reviewed by News1 Marathi on September 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads