Header AD

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लसीकरण मोहिम राबविण्याची राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसची मागणी
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लसीकरण मोहिम राबविण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दुहान, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील  गव्हाणे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राष्ट्रीय सरचिटणीस तथा कोकण विभाग अध्यक्ष किरण शिखरे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण-डोंबिवली जिल्हा अध्यक्ष सुजित रोकडे यांच्या नेतृत्वात तहसीलदार कार्यलयात निवेदन देण्यात आले.देशातील महाविद्यालये गेल्या दीड वर्षापासून बंद आहेत. केंद्र सरकारने देशातील संपूर्ण लोकसंख्येला लसीकरण करण्याची जबाबदारी घेतली आहे. केंद्र सरकार राज्यांना लस पुरवत आहे आणि त्या पुरवठ्यानुसार लसीकरण केले जात आहे. राज्य सरकारकडून मागणी आणि केंद्र सरकारकडून पुरवठा यामध्ये सतत अंतर आहे. यासाठी केंद्र सरकारने स्वतः महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांना लसींचा स्वतंत्र पुरवठा करावा. तसेच केंद्र सरकारच्या वतीने विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी स्वतंत्र धोरण ठरवावे अशी मागणी यावेळी तहसीलदारांमार्फत करण्यात आली.विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान म्हणजे एका पिढीचे नुकसान. विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षणाचे नुकसान थांबवण्यासाठी महाविद्यालये सुरू करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणे अपेक्षित आहे. त्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा अशी मागणी सुजित रोकडे यांनी केली आहे. यावेळी नितीन कदमआदित्य चव्हाणदिनेश महाजनप्रथमेश चव्हाणजयेश भोईर, सुजित पवार आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लसीकरण मोहिम राबविण्याची राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसची मागणी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लसीकरण मोहिम राबविण्याची राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसची मागणी Reviewed by News1 Marathi on September 09, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads