Header AD

युनियन बँक ऑफ इंडियाच्या वतीने अति दुर्गम आदिवासी भागातील १५ स्वयंसहाय्यता महिला बचत गटांना कर्ज मंजूरठाणे, दि. ९ : -   युनियन बँक ऑफ इंडिया, क्षेत्रिय कार्यालय, मुंबई-ठाणे यांच्यावतीने भारत सरकारच्या पुढाकाराने `आजादी का अमृत महोत्सव' अंतर्गत मोखाडा तालुक्यातील अति दुर्गम आदिवासी भागात एका कार्यक्रमाचे आयोजन केले. `मी सुरक्षित आहे, माझे कुटुंब सुरक्षित आहे आणि माझे गाव सुरक्षित आहे' या थीम अंतर्गत येथिल आदिवासी बांधवांच्या शेती, पत आणि आर्थिक उन्नतीसाठी मोखाडा तालुक्यातील पोशेरा गावातील एका आदिवासी गावातील १५ स्वयंसहाय्यता महिला बचत गटांना कर्ज मंजूर करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.          कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमती रेणू के. नायर, डेप्युटी जन. मॅनेजर - क्षेत्रीय प्रमुख, क्षेत्रीय कार्यालय मुंबई -ठाणे यांच्या हस्ते स्थानिक सरपंच निर्मला नवले, एनआरएलएम ब्लॉक मॅनेजर श्री. अमोल, शाळेचे मुख्याध्यापक वासुदेव पाटील, बँक मित्र आणि बचत गटाचे १०० पेक्षा जास्त सदस्य आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. बँकेच्या वतीने यावेळी स्वयंसहाय्यता महिला बचत गट सदस्यांना ४० रोपे वाटप केली आणि शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.           दीपक चंदेल, शाखा व्यवस्थापक, पोशेरा यांनी पोशेरा शाखेशी संबंधित १५ स्वयंसहाय्यता गटांना (एसएचजी) कर्ज मंजूर करण्यासाठी पुढाकार घेतला आणि एसएचजींना मंजुरी पत्रे दिली तसेच पीएमजेजेबीवाय आणि पीएमएसबीवाय सामाजिक सुरक्षिततेअंतर्गत पोशेराच्या संपूर्ण आदिवासी गावाचा विमा काढला.           पोशेरा गावातील जवळजवळ सर्व रहिवासी युनियन बँक ऑफ इंडिया, पोशेरा शाखेत खाते सांभाळत आहेत आणि जवळजवळ प्रत्येकजण भारत सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजना अंतर्गत समाविष्ट आहे.  युनियन बँक ऑफ इंडिया, प्रादेशिक कार्यालय, मुंबई-ठाणे यांनी प्रामुख्याने गावकऱयांमध्ये आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेच्या महत्त्वविषयी जागरूकता निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

युनियन बँक ऑफ इंडियाच्या वतीने अति दुर्गम आदिवासी भागातील १५ स्वयंसहाय्यता महिला बचत गटांना कर्ज मंजूर युनियन बँक ऑफ इंडियाच्या वतीने अति दुर्गम आदिवासी भागातील १५ स्वयंसहाय्यता महिला बचत गटांना कर्ज मंजूर Reviewed by News1 Marathi on September 08, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads