Header AD

पोलिस मित्र जितेंद्र आमोणकार यांचा सत्कार

 
डोंबिवली ( शंकर जाधव )  हिंदवी स्वराज्य संघटनेच्या वतीने  आयोजित 'मी मराठी महाराष्ट्र गौरव पुरस्कार' वितरण सोहळा  मुंबई मराठी पत्रकार संघ, पत्रकार भवन, आझाद मैदान जवळ, छत्रपती शिवाजी टर्मिनस जवळ, येथे संपन्न झाला. 
          त्या कार्यक्रमामध्ये माजी आमदार  विद्या चव्हाण, प्रसिद्ध सिने नाट्य अभिनेत्री जुई गडकरी ,विश्वस्त सिद्धिविनायक मंदिर न्यास- मुंबई आरती साळवी,  हिंदवी स्वराज्य संघटनेचे सचिव सूरज भोईर , होप फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.प्रवीण निचत  यांच्या हस्ते डोंबिवलीतील समाजसेवक तथा पोलीस मित्र जितेंद्र आमोणकर यांना मी मराठी सन्मानपत्र, ट्रॉफी तसेच तिरंगी पट्टा देऊन सत्कार करण्यात आला.
        स्टार वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून अधिकाधिक सामाजिक उपक्रम व सामाजिक कार्य करू.तसेच पुरस्कार म्हणजे केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन शाबासकीची थापच असते.आमोणकर यांचा याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार हा सर्व डोंबिवलीकरांचा सत्कार झाल्यासारखेच आहे असे यावेळी आमोणकर यांचे सहकारी तथा पोलीस मित्र श्रीधर सुर्वे यांनी सांगितले.
पोलिस मित्र जितेंद्र आमोणकार यांचा सत्कार पोलिस मित्र जितेंद्र आमोणकार यांचा सत्कार Reviewed by News1 Marathi on September 01, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads