Header AD

राज्य पुरस्कार प्राप्त गुलाबराव पाटील रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगर्स कडू सन्मानित
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांचे भवितव्य  घडविणाऱ्या व उल्लेखनीय काम करणाऱ्या राज्य पुरस्कार प्राप्त गुलाबराव पाटील यांचा कल्याण येथील रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगर्स कडून नेशन बिल्डर अवार्ड देऊन सन्मान करण्यात आला.पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक हायस्कूलचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणून ओळखले जातात. त्यांना राज्य शासनाने २०१८ चा  राज्य शिक्षक पुरस्कार प्रदान केला आहे.  कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कारासह इतर अनेक  संस्थांचे पुरस्कार गुलाबराव पाटील यांना मिळालेले आहेत. सतत तेरा वर्ष दहावीचा शंभर टक्के निकाल. शैक्षणिक गुणवत्तेबरोबर सहशालेय उपक्रमातून विद्यार्थ्यांच व्यक्तिमत्त्व तयार करणे हा त्यांचा प्रयत्न असतो. शाळेत बैलपोळाबाल जत्राआजी-आजोबा स्नेहमेळावाकैदी  बांधवांना राखी बांधणेसीमेवरील जवानांना राखी पाठविणेशाळाबाह्य मुलांना शाळेत आणणे. असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत असतात.शैक्षणिक कामाबरोबर सामाजिक काम करत असतांना  कोरोना काळात शिक्षकांच्या मदतीने दिव्यांग कुटुंबांना अन्नधान्याची वस्तू रूपात मदत केली. तसेच कोकणातील पूरग्रस्त भागात संसारोपयोगी भांड्यांची मदत केली. संस्थेच्या विकासाकरीता दानशूर व्यक्ती तसेच एन. जी. ओ. संस्थांकडून वस्तू रूपाने मदत मिळवत असतात. रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगर्स चे अध्यक्ष संदीप पवारसचिव चंद्रकांत देवकोषाध्यक्ष प्रेमकुमार मुऱ्हारी आणि प्रोजेक्ट चेअरमन संदीप चौधरी अशा अनेक मान्यवरांच्या ऑनलाइन उपस्थितीत सन्मान पत्रगौरव पदक  देऊन गुलाबराव पाटील यांचा सन्मान करण्यात आला. शाळेचे अध्यक्ष पी. टी.  धनविजयसहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थ्यांकडून गुलाबराव पाटील यांचे अभिनंदन होत आहे.

राज्य पुरस्कार प्राप्त गुलाबराव पाटील रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगर्स कडू सन्मानित राज्य पुरस्कार प्राप्त गुलाबराव पाटील रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगर्स कडू सन्मानित Reviewed by News1 Marathi on September 13, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads