Header AD

कोपर लसीकरण केंद्रात १० हजाराचा लसीकरणाचा टप्पा पार

 
डोंबिवली  ( शंकर जाधव ) कल्याण डोंबिवली महापालिका अंतर्गत लसीकरण केंद्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. पालिकेचे माजी स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांच्या सहकार्याने डोंबिवली विभागीय कोपर लसीकरण केंद्रात लसीकरणाची १० हजार टप्पा पार झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आरोग्य अधिकारी, कर्मचारी आणि कार्यकर्ते यांच्या परिश्रमाला यश आले पुढेही जोपर्यंत कोरोना पूर्णपणे जाईल तोपर्यंत लसीकरण केंद्र सुरू राहील असे म्हात्रे म्हणाले.        या  पत्रकार, रेल्वे कर्मचारी, शिक्षक, वकील, जांभेकर लॅब मधील कर्मचारी आदींना या केंद्रावर कोरोना प्रतिबंध लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला. या केंद्रावर सोमवारी १० हजाराचा लसीकरणाचा टप्पा पार केला.
या लसीकरण केंद्रात जोपर्यंत लस उपलब्ध होईल तो पर्यंत लसीकरण सुरु राहील अशी माजी रमेश म्हात्रे यांनी दिली.विशेष म्हणजे प्रभागात लसीकरणा या विषयी उद्घोषणा केली जाते. त्यानंतर नागरिक केंद्रात लस घेण्यासाठी नावे नोंदणी करतात. कार्यकर्त्यांची फळी या कार्यासाठी तत्पर असून सर्व काम चोख बजावले जाते. 
        आरोग्य अधिकारी तसेच पालिका आरोग्य विभाग कर्मचारी लसीकरण केंद्रात नियोजित काम करीत असल्याने कोणतीही तक्रार नागरिक करीत नाहीत. प्रभागात जे नागरिक आरोग्याच्या तक्रारीमुळे केंद्रात येऊ शकत नाहीत त्यांना त्यांच्या घरी जाऊन लसीकरण केले जाते अशी माहिती म्हात्रे यांनी दिली.१५एप्रिल पासून कोपर येथील लसीकरण केंद्रात लसीकरण सुविधा सुरू झाली आहे. सोमवारी १० हजार क्रमांकावर मयुरी कीर्तीकुडव या तरुणीचे पहिल्या डोसचे लसीकरण झाल्याने तिला आनंद झाल्याचे सांगितले.
कोपर लसीकरण केंद्रात १० हजाराचा लसीकरणाचा टप्पा पार कोपर लसीकरण केंद्रात १० हजाराचा लसीकरणाचा टप्पा पार Reviewed by News1 Marathi on September 27, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मुरबाड मधील उत्कृष्ट दर्जासारखे रस्ते कल्याण –डोंबिवली का बनत नाहीत ? शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचा प्रश्न

  डोंबिवली ( शंकर जाधव ) `डोंबिवली शहरातील रस्त्यावर खड्डे` हे नागरिकांच्या चर्चेला विषय बनला आहे.खड्ड्यामुळे वाहनचालक जखमी होत असून राजकीय ...

Post AD

home ads