Header AD

होप मिरर फाउंडेशनच्या वतीने गोल्डन ह्युमॅनिटी पुरस्कार
कल्याण  , कुणाल  म्हात्रे : होप मिरर फाउंडेशनच्या वतीने गोल्डन ह्युमॅनिटी पुरस्कार आणि गोल्डन प्रेस्टीज पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा याद्वारे गौरव करण्यात येणार आहे.   होप मिरर फाउंडेशन ही एक स्वयंसेवी संस्था आहे. जी मार्च २०२० पासून लॉकडाऊन पासून वंचितांच्या कल्याणासाठी कार्यरत आहे. होप मिररने एका वर्षात ज्या मार्गावर प्रवास केला आहे त्या मार्गावर प्रतिबिंबित करतो. आम्ही जे काही साध्य केले आहे त्याची मी कदर करतो आणि या पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असल्याचे संस्थेचे संस्थापक रमजान शेख यांनी सांगितले.हा पुरस्कार सोहळा १४ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे होणार असून यामध्ये गोल्डन ह्युमॅनिटी पुरस्कार आणि गोल्डन प्रेस्टीज पुरस्काराद्वारे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा १५ जून रोजी होणार होता. परंतु कोविड साथीच्या दुसऱ्या लाटेमुळे प्रत्येकाच्या सुरक्षेला प्राधान्य देत हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.  या पत्रकार परिषदेत रमजान शेख यांच्यासोबत सदफ शेखअरुणा नभशैलेश पटेलपुष्कर ओझाशुभांगी रावतरमेश चौधरी आणि मंदार तांडेल उपस्थित होते. या पुरस्कार सोहळ्यासाठी नामांकन सर्वांसाठी खुले असून इच्छुकांनी संस्थेशी संपर्क  साधण्याचे आवाहन होप मिरर फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. 

होप मिरर फाउंडेशनच्या वतीने गोल्डन ह्युमॅनिटी पुरस्कार होप मिरर फाउंडेशनच्या वतीने गोल्डन ह्युमॅनिटी पुरस्कार Reviewed by News1 Marathi on September 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads