Header AD

कल्याण मध्ये भाजपा शिक्षक आघाडीचे शासना विरोधात आंदोलन
कल्याण  , कुणाल  म्हात्रे   राज्यातील शिक्षक शिक्षकेतरमुख्याध्यापकसंस्थाचालकपालक व विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असून ठाकरे सरकारच्या शिक्षण विरोधी धोरणांमुळे शिक्षणक्षेत्राची अधोगती होत असल्याचा आरोप माजी आमदार व भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांनी केला.  भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हा शिक्षक आघाडीने शिक्षणक्षेत्रातील मागण्यांसाठी कल्याण तहसील कार्यालयासमोर आयोजित केलेल्या आंदोलनात पवार बोलत होते.

यावेळी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारेसहसंयोजक विकास पाटीलकोकण विभाग संयोजक एन एम भामरेकार्यवाह विनोद शेलकर व कल्याण जिल्हा अध्यक्ष सुभाष सरोदेज्ञानेश्वर घुगेअनिरुद्ध चव्हाण,प्रवीण सनेरदिनेश भामरेशरद शिंदे व इतर कार्यकर्ते शिक्षक उपस्थित होते.
शिक्षकांना वेळेवर १ तारखेला वेतन मिळावेवरिष्ठ व निवडश्रेणी शिक्षकांचे प्रशिक्षण तातडीने आयोजित करणेपी एफमेडिकल बिले त्वरित मंजूर करावीशिक्षण सेवकांची ७ व्या वेतन आयोगप्रमाणे वाढ करण्यात यावीजुनी पेंशन योजना सुरू कराशिक्षक शिक्षकेतरांना त्रिस्तरीय १० २० ३० ची योजना लागू कराविद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके त्वरित देण्यात यावीत.

 ऑनलाईन शिक्षणापासून वंचित असलेल्या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. शिक्षक भरती सुरू करण्यात यावीठाणे जिल्ह्यातील शिक्षणक्षेत्रातील भ्रष्टाचार थांबवावासंस्थाचालकांना आर टी ई प्रतिपूर्ती वेळेवर द्यावी यासह अन्य मागण्यांचे निवेदन कल्याण तहसिलदार व कल्याण शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना देण्यात आले.

कल्याण मध्ये भाजपा शिक्षक आघाडीचे शासना विरोधात आंदोलन कल्याण मध्ये भाजपा शिक्षक आघाडीचे शासना विरोधात आंदोलन Reviewed by News1 Marathi on September 08, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads