Header AD

एक वही एक पेन बाप्पाच्या चरणी अभियान तिरंगा जागृती विचार मंच आणि टीम परिवर्तनचा एकत्रित उपक्रम
कल्याण , कुणाल म्हात्रे  : गणपती उत्सव म्हणजे आनंदाचा आणि जल्लोषाचा परिपूर्ण आस्वाद. याच गणपती उत्सवात आपल्याला विविध सामाजिक उपक्रमपर्यावरणपुरक मुर्त्यासजावटी पहावयास मिळतात असाच एक उपक्रम कल्याण शहरात तिरंगा जागृती विचार मंच आणि टीम परिवर्तनच्या माध्यमाने गेल्या काही वर्षांपासून सातत्याने गणपती उत्सवात होत असतो. बाप्पाच्या चरणी एक वही आणि एक पेन अर्पण करावे आणि जमलेले साहित्य गरीब गरजु विद्यार्थ्यांना मदत म्हणुन द्यावे यासाठी या दोन सामाजिक संस्था दरवर्षी हा उपक्रम राबवत आहेत. यावर्षीदेखील बाप्पाच्या चरणी एक वही आणि एक पेन अर्पण करण्याचे आवाहन नागरिकांना संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. तिरंगा जागृती विचार मंचच्या वतीने चेतन म्हामुणकर जमलेले साहित्य टीम परिवर्तनाकडे सुपूर्द करतात आणि जमलेल्या साहित्यातून गरीब आणि गरजु विद्यार्थ्यांना मदत करण्यात येते. घरोघरी जाऊन तिरंगा जागृती विचार मंचच्या वतीने एक वही आणि एक पेन बाप्पाच्या चरणी अर्पण करण्यात येते आणि पुन्हा हे साहित्य वाटपासाठी एकत्र जमा केले जाते गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेला हा उपक्रम यावर्षीही जोमाने चालू आहे. जमलेल्या साहित्याची विभागणी करून जवळपासच्या आदिवासी पाड्यातील गरजु विद्यार्थ्यांना हे साहित्य वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती चेतन म्हामुणकर यांनी यावेळी दिली. तिरंगा जागृती विचार मंच चे संस्थापक सचिन यादवडे यांनी गणेशोत्सव काळात विविध सामाजिक उपक्रम राबविले गेले पाहिजे असे यावेळीं सांगितले. घरोघरी गणपती उत्सव साजरा करताना बाप्पाच्या चरणी अशाच प्रकारे शैक्षणिक साहित्य अर्पण केल्यास नक्कीच या साहित्याचा फायदा गरजु विद्यार्थ्यांना होईल यासाठी सर्वांनी आपल्या घरी बाप्पाच्या चरणी साहित्य जमा करावे आणि ते गरीब विद्यार्थ्यांना मदत म्हणून द्यावे असे टीम परिवर्तनचे अविनाश पाटील यांनी यावेळी सांगितले. उपक्रमात भुषण राजेशिर्के आणि स्वप्नील शिरसाठ साहित्य संकलनाचे काम करत आहेत.

एक वही एक पेन बाप्पाच्या चरणी अभियान तिरंगा जागृती विचार मंच आणि टीम परिवर्तनचा एकत्रित उपक्रम एक वही एक पेन बाप्पाच्या चरणी अभियान तिरंगा जागृती विचार मंच आणि टीम परिवर्तनचा एकत्रित उपक्रम Reviewed by News1 Marathi on September 13, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads