Header AD

महाराष्ट्रतील घरगुती गणपती आणि सार्वजनिक मंडळे सजावट स्पर्धा,जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा उपक्रम..


भिवंडी दि 11(प्रतिनिधी ) स्व:कमाईतून सामाजिक बांधीलकी जपणारी भारतातील एकमेव अग्रगण्य शैक्षणिक व सामाजिक संस्था  जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून यंदाही आपल्या बाप्पाच्या आगमनाला कोरोना नावाचं संकट हे आहेच परंतु आपल्या बाप्पाचे स्वागत  आपण खूप जल्लोषात करणार ह्याची खात्री आहे.. म्हणूनच गणेश भक्तांसाठी  जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था घेऊन येत आहे घरगुती गणपती आणि सार्वजनिक मंडळे सजावट स्पर्धा वर्ष 2021 ही स्पर्धा सर्व वयोगटांसाठी आहे.     
             सदर स्पर्धा ही तुमच्यामध्ये असलेले गुणांना वाव मिळावा  व समाजाला आपल्यामुळे काही संदेश मिळावा  म्हणून आयोजीत करण्यात आली आहे..स्पर्धा म्हटले की त्याचे काही नियम तर येणारच.आपल्या स्पर्धेचे नियमात  
 तुमच्या सजावटीचे (Decoration) पूर्ण दिसेल असे 3 ते 5 फोटोज् तुम्ही पाठवावे,सजावटीसोबत आपल्या लाडक्या बाप्पाचे देखील फोटोज् तुमच्या सोबत त्यामध्ये प्रामुख्याने असावे,सजावटीचे फोटोज आणि विडिओ आमच्या फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर ला टॅग करणे अनिवार्य आहे. 
                  Jijauganeshmahostav2021 
NileshSambare,JijauMahotsav यावर पाठवावे 
त्याच प्रमाणे तुमच्या संपूर्ण सजावटीचे आणि लाडक्या बाप्पाच्या मूर्तीची कमीतकमी 30 सेकंदची व्हिडिओ आम्हाला पाठवावा,तुम्ही सदर व्हिडिओ तुमच्या मोबाईल फोन किंवा कॅमेरा या मधून घेऊ शकतात.,तुमच्या सजावटीमधून समाजाला कोणता तरी संदेश मिळावा हे खुप महत्वाचे आहे.

             त्याच प्रमाणे स्पर्धा म्हटले की त्याचे बक्षीस देखील येणारच, त्यासाठी पहिलं पारितोषिक 1 लाख 11 हजार 111, दूसरे पारितोषिक  55 हजार 555 तिसरे पारितोषिक  25 हजार 555 एवढे असून  स्पर्धेत भाग घेण्यासाठी  
https://forms.gle/fnLgJvxDRuGG12bD8 या लिंक वर क्लिक करा सजावटीचे फोटोज आणि विडिओ  77988 56788 / 7972358309 या नंबर वर पाठवावेत. अशी माहिती संस्थेने पत्रकारांना दिली आहे.
महाराष्ट्रतील घरगुती गणपती आणि सार्वजनिक मंडळे सजावट स्पर्धा,जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा उपक्रम.. महाराष्ट्रतील घरगुती गणपती आणि सार्वजनिक मंडळे सजावट स्पर्धा,जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा उपक्रम.. Reviewed by News1 Marathi on September 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads