Header AD

मुख्यमंत्र्यानी अनधिकृत बांधकामा बाबत दिलेल्या आश्वासना नुसार आता तरि कारवाई होणार का? काॅग्रेसचा सवाल...



ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांवर झालेल्या हल्ल्यानंतर कल्पिता पिंपळे यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यानी दूरध्वनीवरून दिलेल्या आश्वासनानंतर आतातरि ठाणे महानगरपालिका अनधिकृत बांधकामावर कडक कारवाई करतील का? की केराची टोपली दाखवतील? असा खोचक सवाल काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे.


           ठाणे शहर काॅग्रेसचे अध्यक्ष अॅड.विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील अनधिकृत बांधकाम विरोधात मोठी मोहीम राबविण्यात आली होती दिवा प्रभाग समिती समोर तसेच ठाणे महापालिका मुख्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने अनधिकृत बांधकामावरिल कारवाई साठी उपोषण करण्यात आले होते सातत्याने याप्रश्नी आवाज उचलत असताना जिल्हाध्यक्ष व नगरसेवक अॅड.विक्रांत चव्हाण यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही लक्षवेधी सूचना मांडली होती तरिही अनधिकृत बांधकामावर दिखाऊ कारवाई होत होती असा आरोप शहर काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे.


         कालच सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे याच्यावर झालेल्या गंभीर हल्ल्यानतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले या रूग्णालयात पालकमंत्री तसेच गृहनिर्माण मंत्र्यांनीही पिंपळे यांची भेट घेऊन चौकशी केली मुख्यमंत्र्यांनी  त्याची चौकशी करत असताना अनधिकृत बांधकामावर कारवाई अधिक गतीने करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.



           मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे यानी ठाणे महानगर पालिकेकेचे महापौर व आयुक्त यांच्या उपस्थितीत तसेच महापौर यांच्याच मोबाईल वरून दिलेल्या या आश्वासनानंतर तरी ठाणे महानगरपालिका प्रशासन व सत्ताधारी आतातरी कारवाई करतील का? की केराची टोपली दाखवतील?अशा खोचक प्रश्न शहर काॅग्रेसच्या वतीने विचारण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यानी अनधिकृत बांधकामा बाबत दिलेल्या आश्वासना नुसार आता तरि कारवाई होणार का? काॅग्रेसचा सवाल... मुख्यमंत्र्यानी अनधिकृत बांधकामा बाबत दिलेल्या आश्वासना नुसार आता तरि कारवाई होणार का? काॅग्रेसचा सवाल... Reviewed by News1 Marathi on September 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads