Header AD

शिक्षणा पलीकडे ही विविध विषयां वरील मार्गदर्शनासाठी विद्यार्थ्यांना होते शिक्षकांची मदत: ब्रेनली
मुंबई, ३ सप्टेंबर २०२१ : भारतीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदती व्यतिरिक्त ही विविध विषयांवरील मार्गदर्शनासाठी शिक्षकांची मदत होत असल्याचे ब्रेनली या जगातील सर्वात मोठे ऑनलाइन लर्निंग मंचाद्वारे केलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. सध्या सुरु असलेल्या ऑनलाईन लर्निंग परिस्थितीत शिक्षकांची विकसित भूमिका आणि विद्यार्थी या बदलाशी कसे जुळवून घेत आहेत हे जाणून घेण्याचा उद्देश या सर्वेक्षणामागे होता.  


शिक्षणापलीकडे ही होते शिक्षकांची मदत:


शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी शिक्षकांशी सक्रियपणे संपर्क साधण्याबरोबरच बहुसंख्य (७२%) विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांशी अभ्यासेतर मार्गदर्शनासाठी ही संपर्क साधत असून यात त्यांना शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन लाभत आहे. गेल्या वर्षीपेक्षा ही वाढ अधिक आहे जिथे केवळ ५७% लोकांनी शैक्षणिक मदत घेण्यापलीकडे त्यांच्या शिक्षकांकडे संपर्क साधला. पुस्तकांच्या शिफारशी सामायिक करण्यापासून ते नवीन ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म सुचवण्यापर्यंत, शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही शिकण्याच्या वेगवेगळ्या प्रकारांचा शोध घेत आहेत, नवीन माहितीशी संलग्न आहेत आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासात एकत्र प्रगती साधत आहेत.साथीच्या रोगानंतरच्या औद्योगिक परिदृश्याच्या पार्श्वभूमीवर, सर्वेक्षणात असे आढळले आहे की ७०% भारतीय विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांकडून करिअर मार्गदर्शन घेत आहेत. गेल्या वर्षीच्या निष्कर्षाच्या १३% वाढ आहे. नवीन आवडीच्या क्षेत्रांचा शोध घेण्यापासून ते नवीन शैक्षणिक संधींचे सोनं करण्यासाठी विद्यार्थी सक्रियपणे त्यांच्या शिक्षकांकडे मार्गदर्शनासाठी आस लावून आहेत.ऑनलाइन शिक्षणामुळे शिक्षकांशी संवादाची दरी झाली कमी:


गेल्या वर्षी पारंपारिक पद्धतीने शिक्षण देणाऱ्या शाळांना अचानक कुलूप लागले आणि या शाळा लगेचच ऑनलाईन शिक्षण पध्दतीकडे वळल्याने सामान्य विद्यार्थी आणि शिक्षकांच्या या नवीन ऑनलाईन वर्गाच्या अनुभवाबद्दल काही चिंता निर्माण झाली. आभासी संवाद हे वैयक्तिक संवादांइतकेच प्रभावी असतील का? नवीन घरबसल्या अभ्यास धारणेवर विद्यार्थी काय प्रतिक्रिया देतील? याचा त्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर परिणाम होईल का? अशा चिंता सोडवताना ब्रेनलीच्या ताज्या सर्वेक्षणात असे आढळले आहे की ६७% विद्यार्थ्यांना असे वाटते की ऑनलाइन शिक्षणामुळे आवश्यकतेनुसार त्यांच्या शिक्षकांशी संपर्क साधणे सोपे झाले आहे.ऑनलाइन शिकण्याच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनाही जीवनशैली, वेळापत्रक आणि अध्यापन आणि शिकण्याच्या पद्धती आणि साधनांमध्ये बदल करताना संघर्षाला सामोरे जावे लागले आहे. ४८% विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गादरम्यान शिक्षकांच्या अध्यापन शैलीत फरक जाणवला आहे यात आश्चर्य नाही. यातील काही बदल परिस्थितीनुसार बदललेल्या शिक्षक-विद्यार्थी संबंधांमध्ये प्रतिबिंबित होतात., काही अंशी शिक्षकांना त्यांच्या विद्यार्थ्यांशी अधिक संयम, समज आणि सहानुभूती वापरावी लागत आहे. या बदलांशी जुळवून घेत ४३% उत्तरदात्यांना असे वाटते की शिक्षक पूर्वीपेक्षा शैक्षणिक समस्या सोडविण्यात कमालीचे मित्र झाले आहेत.ब्रेनलीचे मुख्य उत्पादन अधिकारी राजेश बिसाणी म्हणाले, 


"साथीच्या रोगाच्या काळात ऑनलाइन शिक्षण हा शिक्षणाचा एकमेव मार्ग बनला असला, तरी नजीकच्या भविष्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षक दोघांसाठी एकूण इन-क्लासरूम शिकण्याच्या अनुभवाला तो पूरक आहे. सर्वेक्षणात असे नमूद करण्यात आले आहे की ७२% विद्यार्थी शाळांमध्ये परत येण्यास आणि त्यांचे शिक्षण नव्या उमेदीने पुढे नेण्यासाठी उत्सुक आहेत.बहुसंख्य विद्यार्थी वर्गात परत येण्याची वाट पाहत आहेत याचे कारण म्हणजे त्यांना त्यांच्या सवंगडी तसेच शिक्षकांशी वैयक्तिक संवाद साधायचा आहे. वैयक्तिक अनुभूती हा सामाजिक शिक्षणाचा एक आवश्यक भाग आहे. जो पारंपारिक शिक्षण प्रणालीत अधिक कार्यक्षमतेने होतो. हा निष्कर्ष आमच्या विश्वासाशी जुळलेला आहे की पारंपारिक शिक्षण प्रणाली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शिक्षणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत राहील. या पार्श्वभूमीवर, प्रचलित अकार्यक्षमता दूर करून आणि शिक्षण अधिक सुलभ आणि परवडणारे बनवून पारंपारिक शिक्षण प्रणालीची जागा घेणे नव्हे तर पूरक करणे हा एडटेकचा उद्देश आहे."

शिक्षणा पलीकडे ही विविध विषयां वरील मार्गदर्शनासाठी विद्यार्थ्यांना होते शिक्षकांची मदत: ब्रेनली शिक्षणा पलीकडे ही विविध विषयां वरील मार्गदर्शनासाठी विद्यार्थ्यांना होते शिक्षकांची मदत: ब्रेनली Reviewed by News1 Marathi on September 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads