Header AD

नगरसेवक वामन म्हात्रे यांच्या वाढदिवसा निमित्त शास्त्रीनगर रुग्णालयात १५०० बिस्कीट पुड्यांचे वाटप
कल्याण , कुणाल  म्हात्रे : गेली २५ वर्ष समाजकार्यात आणि राजकारणात सक्रिय असणारे अभ्यासू, 'जनसेवा हिच ईश्वरसेवाहे प्रमाण मानणारे जेष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते आणि युवासेना उपशहर अधिकारी अनमोल म्हात्रे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात बिस्किटाच्या १५०० पुड्यांचे वाटप केले.वडीलांप्रमाणेच सामाजिक बांधिलकी जपत अनमोल म्हात्रे हे सुद्धा जनसेवेसाठी सदैव तत्पर असतात. वामन म्हात्रे यांनी कोरोना काळामध्येच नाही तर जेव्हा कधी विभागामध्ये नैसर्गिक आपत्ती असो किंवा नागरिकांची काही वैयक्तीक समस्या असो अशा प्रसंगी ते मदतीसाठी सदैव तत्पर असतात. त्यांचे हेच गुण अंगीकारून त्यांच्या वाढदिवसानिमित्त काही सामाजिक उपक्रम हाती घ्यावे याकरिता अनमोल म्हात्रे आणि त्यांचे सहकारी शाखाप्रमुख मनोज वैद्यमहेश तावडे, मुकेश चित्ते  आदींनी बिस्कीट वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता.


नगरसेवक वामन म्हात्रे यांच्या वाढदिवसा निमित्त शास्त्रीनगर रुग्णालयात १५०० बिस्कीट पुड्यांचे वाटप नगरसेवक वामन म्हात्रे यांच्या वाढदिवसा निमित्त शास्त्रीनगर रुग्णालयात १५०० बिस्कीट पुड्यांचे वाटप Reviewed by News1 Marathi on September 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads