Header AD

कोरोना महामारी दूर करण्यासाठी मनसेच्या वतीने साईबाबांची महाआरती

 

■मंदिरे न उघडल्यास आघाडी सरकार विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा मनसेचा इशारा....  

कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कोरोनारुपी महा भयंकर राक्षसाचा नायनाट करण्यासाठी कल्याणमध्ये मनसेच्या वतीने साईबाबांची महाआरती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्या पुढाकाराने करण्यात आलेल्या या आरतीमध्ये कोरोना आजारापासून मुक्तता देण्यासाठी साईबाबांना साकडे घालण्यात आले. तर भाविकांना दर्शनासाठी मंदिरे त्वरित न उघडल्यास महाआघाडी सरकार विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला.         यावेळी माजी आमदार तथा मनसे सरचिटणीस प्रकाश भोईर, जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईर, शहर अध्यक्ष  कौस्तुभ देसाई, रस्ते आस्थापना जिल्हा अध्यक्ष रोहन आक्केवार, जनहित-विधी कक्ष शहर अध्यक्ष उदय वाघमारे, रस्ते आस्थापना शहर अध्यक्ष रोहन पोवार, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष विनोद केणे, महिला शहर अध्यक्षा शितल विखणकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.       १०० वर्षा पुर्वी शिडीत व आजुबाजुच्या गावांमध्ये हैजा या महामारीनी हाहाकार केला होता. आजुबाजुच्या गावातील कित्येव नोकांना त्यांचा जिव गमवावा लागला त्या वेळी शिर्डीतील संत साईबाबा  यांनी आपल्या चमत्काराने या महामारी शिर्डीच्या वेशीवरच संपुष्टात आणला. आजची परिस्थिती लक्षात घेता अश्याच चमत्काराची गरज आहे. कोरोना सारख्या महामारीमुळे लोकांचे जिवन विस्कळीत झाले आहे.          बऱ्याच लोकांनी आपला जिव गमवला आहे. त्यामुळे  कोरोना महामारी महाभयंकर राक्षसाचा नायनाट करण्यासाठी खडकपाडा साईचौक येथील साईबाबा मंदिरात महाआरतीव्दारे साईबाबांना विनवणी करण्यात आली असल्याची माहिती उल्हास भोईर यांनी दिली.       तर भाविकांना दर्शनासाठी मंदिरे बंद असल्याने यावेळी मनसेच्या वतीने आघाडी सरकार विरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच लवकरात लवकर मंदिरे उघडण्याची मागणी देखील केली. मंदिरे लवकर न उघडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी मनसेच्या वतीने देण्यात आला. दरम्यान मंदिरामध्ये आरती करणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांना खडकपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

कोरोना महामारी दूर करण्यासाठी मनसेच्या वतीने साईबाबांची महाआरती कोरोना महामारी दूर करण्यासाठी मनसेच्या वतीने साईबाबांची महाआरती Reviewed by News1 Marathi on September 09, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads