Header AD

ठाणे-कल्याण दरम्यान लोकल, एक्स्प्रेस आणि गुड्ससाठी वेगळे ट्रॅक्स ! खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी "कोपर" होम प्लॅटफॉर्मच्या कामाची केली पाहणी

डोंबिवली ( शंकर जाधव )  मध्य रेल्वेच्या कोपर रेल्वे स्थानकात बांधण्यात आलेल्या होम प्लॅटफॉर्म कामाची पाहणी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. ठाणे-कल्याण दरम्यान ५  व ६ ट्रॅकच काम आणि प्लॅटफॉर्मवर कामांबाबत शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. कोपर रेल्वे स्थनाक परिसरातील उर्वरित काम लवकरच पूर्ण होऊन सुमारे २५  लोकलची वाढ होईल असे वक्तव्य खासदार शिंदे यांनी केले.


   
        खासदार डॉ. शिंदे हे ठाण्यावरून रेल्वेप्रवास करीत कोपर स्थानकात आले. यावेळी संपर्क प्रमुख सदानंद थरवळ, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, जेष्ठ नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे, माजी नगरसेवक संजय पावशे, भाई पावडीकर, सागर जेधे  तसेच रेल्वे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले की, होम प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण झाले असून येत्या पंधरा दिवसात इलेक्ट्रिकचे काम पुर्ण होईल. 
         कोपरगावातील रेल्वे प्रवाश्यांना या होम प्लॅटफॉर्ममुळे कनेक्टिव्हिटी चांगली होणार आहे. पूर्वी रेल्वे रूळ क्रॉसकरून जावं लागतं होतं हा मोठा अडथळा होता तो होम प्लॅटफॉर्ममुळे दूर झाला आहे. ठाण्याच्या दिशेला रेल्वे पादचारी पुलाचे काम सुरू आहे त्या पुलाचे काम लवकर पूर्ण होऊन त्याचा वापर रेल्वे प्रवाश्यांना करता येईल. 
        त्याचप्रमाणे पाच व सहा रेल्वे ट्रॅकचे काम सुरू असून आता ते लवकरच पूर्ण होईल. त्यामुळे आता रेल्वे लोकल, एक्स्प्रेस आणि गुडस् मध्ये व्यत्यय येणार नाही. परिणामी लोकलच्या सुमारे 25 फेऱ्या वाढल्याने रेल्वेप्रवास सुखावणार आहे. फेब्रुवारीपर्यंत सहा लाईन्सचे काम पूर्ण होईल असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सांगितले

ठाणे-कल्याण दरम्यान लोकल, एक्स्प्रेस आणि गुड्ससाठी वेगळे ट्रॅक्स ! खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी "कोपर" होम प्लॅटफॉर्मच्या कामाची केली पाहणी ठाणे-कल्याण दरम्यान लोकल, एक्स्प्रेस आणि गुड्ससाठी वेगळे  ट्रॅक्स ! खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी "कोपर" होम प्लॅटफॉर्मच्या कामाची केली पाहणी Reviewed by News1 Marathi on September 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads