Header AD

पोलिसांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना सक्रीय


■कल्याण मधील बैठकीत निवृत्त पोलिसांनी मांडल्या आपल्या व्यथा...कल्याण , कुणाल  म्हात्रे  : पोलिसांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना सक्रीय झाली असून कल्याण मध्ये पार पडलेल्या बैठकीत निवृत्त पोलिसांनी मांडल्या आपल्या व्यथा मांडल्या. 

            माधव  माळवेरघुनाथ  घरटेसंपत निर्मळप्रल्हाद ठाकूर व सर्व पदाधिकारी  कल्याण व डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ व बदलापूर यांनी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना ठाणे जिल्हा अध्यक्ष उमेश भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण येथे पोलीस वसाहतीमध्ये सावित्रीबाई फुले हॉल मध्ये सर्व निवृत्त वरिष्ठ निरीक्षक पोलिस अधिकाऱ्यांची विभागीय सभा आयोजित करण्यात आली होती. 

या सभेमध्ये सर्व निवृत्त पोलिसांच्या अडचणी मांडल्या गेल्या. या सर्व अडचणींचे व सर्व प्रश्नांचे निरसन करण्याचे आश्वासन संघटनेने दिले. सर्व वरिष्ठ निरीक्षक पोलिस अधिकाऱ्यांनी या सभेत जेव्हा ते त्यांच्या त्यांच्या पदावर नियुक्त होते त्या संदर्भातले काही रोचक असे अनुभव सांगितले.

 मीटिंगमध्ये सर्व पोलीस परीवारा संबंधित प्रश्न मांडले गेलेपोलीस कल्याणकारी असोसिएशनचे अध्यक्ष माधव माळवे यांनी आश्वासन देत असे सांगितले की, पोलीस सेवेतून निवृत्त झाल्यावर  आता याप्रसंगी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना हे निवृत्त पोलिसांसाठी नेहमीच आघाडीवर राहील. 

तसेच त्यांच्या निवृत्त झाल्यानंतर च्या म्हातारपणात त्यांचा आधार होतील व त्यांच्या न्याय हक्कासाठी लढतील असे आश्वासन दिलेया कार्यक्रमाला महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे सल्लागार सुनील उत्तेकर तसेच पदाधिकारी मोहित गोळे व जयेश चव्हाण उपस्थित होते.

पोलिसांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना सक्रीय पोलिसांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना सक्रीय Reviewed by News1 Marathi on September 08, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads