Header AD

उंदराने डोळे कुरतडलेल्या व्यक्तिच्या मृत्यूनंतर परिसरात खळबळ


उंदरणारे डोळे कुरतडले मात्र अतिमद्यसेवनामुळे लिव्हर खराब झाल्याने मृत्यू झाल्याचा रुग्णायलाचे स्पष्टीकरण....


कल्याण, कुणाल  म्हात्रे  : उंदीराने डोळे कुरतडल्याने रेल्वे कर्मचारी सुरेश साळवे याला रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे.  अति मद्यसेवानामुळे त्यांचे लिव्हर डॅमेज झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे कारण रेल्वे रुग्णालयातील डॉक्टरांनी वैद्यकीय अहवालात सांगितले आहे.           मात्र उंदराने डोळा कुरतडल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. परिसरात कोणत्याही प्रकारची स्वच्छता नसल्याने त्यांठिकाणी उंदराचा सुळसुळाट आहे. त्यामुळे नागरीक त्रस्त असून तातडीने परिसराची स्वच्छता करावी अशी मागणी केली आहे
           डोंबिवली पूर्व ठाकूर्ली परिसरात सुरेश साळवे त्यांची पत्नी आणि तीन मुलांसोबत रेल्वे कॉलनीत राहतात. सुरेश रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये खलाशी म्हणून कामाला होते. बुधवारी ते झोपेत असताना उंदीराने त्यांचे डोळे कुरतडले. तसेच त्यांची नखे खाल्ली होती.         सकाळच्या सुमारास सुरेश  रक्तबंबाळ झाल्याचे दिसल्याने कुटुंबियांनी त्यांना कल्याणच्या रेल्वे रुग्णालयात दाखल केले. दरम्यान अति मद्यसेवनामुळे त्यांचे लिव्हरवर उपचार सुरु होते. काही दिवसापूर्वी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. गुरुवारी त्यांचा डोळा आणि नखे उंदराने कुरतडल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.           अति मद्यसेवनामुळे त्यांचे लिव्हर डॅमेज झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे कारण वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे.रेल्वे रुग्णालय प्रशासनाणे सुरेश याचे डोळे उंदराने कुरतडले होते त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला नाही तर अति मद्यसेवणामुळे त्यांचे लिव्हर डॅमेज झाले होते त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले मात्र कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला.
उंदराने डोळे कुरतडलेल्या व्यक्तिच्या मृत्यूनंतर परिसरात खळबळ उंदराने डोळे कुरतडलेल्या व्यक्तिच्या मृत्यूनंतर परिसरात खळबळ Reviewed by News1 Marathi on September 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads