Header AD

कोकण शिक्षक मतदार संघ नोंदणी व जागृती अभियानाला सुरुवात


■कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपाचा शिक्षक आमदार निवडून आणणार - माजी आमदार नरेंद्र पवार , शिक्षक दिनानिमित्त कोरोना योद्धे शिक्षकांचा नरेंद्र पवार यांच्याहस्ते सन्मान...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  शिक्षकांच्या अनेक समस्या माजी शिक्षक आमदार स्व.बापट सररामनाथ मोते सर यांनी विधिमंडळात शासनाशी संघर्ष करून सोडविल्या परंतु आता मात्र शिक्षकांना कोणी वाली उरला नसून बापट व मोते सरांची पोकळी भरून काढण्यासाठी हा मतदारसंघ पुन्हा भाजपाच्या ताब्यात आणून आपलाच शिक्षक आमदार निवडून आणू असे प्रतिपादन माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केले.


भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडीशिक्षण संघर्ष संघटनाक्रीडा भारतीजुनी पेंशन योजना समितीकोकण-मुंबई मराठी अध्यापक संघाने आयोजित केलेल्या कोकण शिक्षक मतदार संघाच्या शिक्षक नोंदणी जागृती-संपर्क अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी नरेंद्र पवार बोलत होते. यावेळी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारेक्रीडा भारती संघटनेचे महादेव क्षीरसागरजुनी पेंशन योजना समितीचे रोहित पाटीलमुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष गुलाबराव पाटीलआचिवर्स कॉलेजचे विश्वस्त महेश भिवंडीकरप्रा चंद्रशेखर भारतीअभिनव विद्यामंदिराचे मुख्याध्यापक संपत गीते आदी उपस्थित होते.कोकण शिक्षक मतदारसंघाची निवडणूक २०२३ च्या सुरुवातीला होणार असून शिक्षकांची जास्तीत जास्त नोंदणी व्हावी यासाठी सुरू केलेल्या नोंदणी मोहिमेचा शुभारंभ आज झाला असल्याचे भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी प्रास्ताविकात सांगितले. यासाठी सर्व समविचारी संघटनांना सोबत घेऊन कोकण विभागातील सहाही जिल्ह्यातील प्रत्येक शिक्षकांपर्यंत पोहचणार असल्याचेही बोरनारे यांनी सांगितले. यावेळी कोरोना काळात शिक्षणक्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापकांचा नरेंद्र पवार यांच्याहस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

कोकण शिक्षक मतदार संघ नोंदणी व जागृती अभियानाला सुरुवात कोकण शिक्षक मतदार संघ नोंदणी व जागृती अभियानाला सुरुवात Reviewed by News1 Marathi on September 06, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads