Header AD

आयटी, रिअॅलिटी, ऑटो स्टॉक्स मधील तेजीने शेअर बाजाराने नवीन उच्चांक गाठला




मुंबई, ६ सप्टेंबर २०२१ : भारतीय निर्देशांकांनी आज आशियातील मजबूत संकेतांमुळे उच्चांकी पातळीवर व्यापार सुरु केला. बेंचमार्कनी आज गॅप-अप ओपनिंग अनुभवले. ट्रेडिंग दिवसाच्या काळात निर्देशांकांनी सर्वोच्च पातळी गाठली. तथापि, सुरुवातीनंतर संपूर्ण दिवसभर निर्देशांक अस्थिर होते. अखेरीस सलग तिसऱ्या सत्रात निर्देशांक सकारात्मक स्थितीत स्थिरावले. तर निफ्टी बँक इंडेक्सने ३०० पेक्षा जास्त अंकांनी निचांकी पातळी गाठत सलग दुसऱ्या सत्रात घसरण अनुभवली.



      एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की, ब्रॉडर मार्केटने सकारात्मक गती अनुभवली. कारण दोन्ही निर्देशांकांनी सकारात्मक नफ्यावर विश्रांती घेतली. स्मॉल कॅप इंडेक्सने १.०९ टक्क्यांनी वृद्धी केली. तर मिडकॅप इंडेक्सने ०.४१ टक्क्यांची वाढ अनुभवली. तर दुसरीकडे सेक्टर्सच्या आघाडीवर निफ्टी रिअॅलिटी इंडेक्सने सलग ८ व्या दिवशी नफा कमावला. आजच्या सत्रातही त्याने उच्चांकी पातळी गाठली. 



       हा इंडेक्स ३.१६ टक्क्यांनी वाढला. तर आयटी, मीडिया हे सेक्टर हे आजच्या दिवसातील आणखी दोन टॉप परफॉर्मर ठरले. तसेच बँकिंग आमि फायनान्शिअल सर्व्हिस या दोन सेक्टर्सनी अतिशय खराब कामगिरी केली. दरम्यान आजच्या सत्रातील टॉप परफॉर्मिंग स्टॉक्समध्ये विप्रो, एचसीएल टेक आणि इंफोसिस हे ठरले. यांनी प्रत्येकी १-४ टक्क्यांची बढत घेतली. तर आयओसी, ओएनजीसी आणि इंडसबँक या लूझर स्टॉक ठरले.



       रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉकच्या किंमतींनी नवा उच्चांक गाठला. इंट्राडेमध्ये ३ टक्क्यांचा नफा कमावला. कंपनीच्या उपकंपनीने स्ट्रँड लाईफ सायन्समध्ये समभाग अधिगृहित केल्यानंतर हे परिणाम दिसले. या स्टॉकनी १ टक्के नफा कमावत विश्रांती घेतली. आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीने इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडियाकडून भारती एक्सा जनरल इन्शुरन्स कंपनीच्या प्रस्तावित योजनेच्या व्यवस्थापनासाठी मंजूरी मिळवली. त्यानंतर कंपनीच्या स्टॉक्सनी ४ टक्क्यांची वृद्धी अनुभवली.



         तात्पर्य म्हणजे, निफ्टी आज दिवसातील उच्चांकीनंतर ५० अंकांनी घसरत सकारात्मक स्थितीत विसावला. तर सेन्सेक्सने १६६ अंक किंवा ०.२९ टक्क्यांची वृद्धी घेत ५८२९६ अंकांवर विश्रांती घेतली. निफ्टीने ५४ अंकांची   किंवा ०.३१ टक्क्यांची वाढ अनुभवत १७,३७७ अंकांवर विश्रांती घेतली. तसेच निफ्टीची पुढची घोडदौड पहायची असल्यास १७४००-१७४५० या अपसाईड पातळीकडे किंवा १७१०० या डाऊनसाईड पातळीकडे लक्ष ठेवावे लागेल.

आयटी, रिअॅलिटी, ऑटो स्टॉक्स मधील तेजीने शेअर बाजाराने नवीन उच्चांक गाठला आयटी, रिअॅलिटी, ऑटो स्टॉक्स मधील तेजीने शेअर बाजाराने नवीन उच्चांक गाठला Reviewed by News1 Marathi on September 06, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads