Header AD

आयटीसी च्या सनफीस्ट बाउन्सने त्यांच्या क्रीम बिस्किट रेंजमध्ये घातली ग्लुकोजची भर


■सनफीस्ट बाउन्स क्रीमचे लोकप्रिय स्वाद कुरकुरीत ग्लुकोज बिस्किटांमध्ये सामावले आहेत...


मुंबई - ६ सप्टेंबर २०२१ : आयटीसी चे सनफीस्ट बाउन्स हा क्रीम बिस्किट सेगमेंटमध्ये आघाडीवर असून मुलांमध्ये व प्रौढांमध्ये तो सारख्याच प्रमाणात लोकप्रिय आहे. त्यांनी आपल्या क्रीम बिस्किटांच्या रेंजमध्ये ग्लुकोजच्या गुणवैशिष्ट्यांची भर घातली आहे. सनफीस्ट बाउन्सतर्फे असे प्रथमच करण्यात आले आहे. आता ग्राहकांना ऑरेंज, चॉकलेट, पायनॅपल आणि इलायची या क्रीम बिस्किट व्हेरिअंट्सचा ग्लुकोजसह आस्वाद घेता येईल.            ग्राहकांची आवड लक्षात घेता असे दिसून आले की अधिक चांगले घटक असलेली उत्पादनांना मुलांच्या आया प्राधान्य देतात. त्यामुळे ग्राहकांसाठी ग्लुकोज बिस्किटचा खाद्यानुभव अधिक चांगला करण्याचा सनफीस्ट बाउन्सने चंग बांधला, ज्यात क्रीम आणि ग्लुकोज बिस्किटच्या स्वादाची सांगड घालण्यात येऊन हा एकत्रित अनुभव देऊ केला आहे.        या लाँचबद्दल आयटीसी लिमिडेटच्या फुड्स डिव्हिजनच्या बिस्किट्स व केक क्लस्टर विभागाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्री. अली हॅरिस शेरे म्हणाले, “बिस्किट सेगमेंटमध्ये ग्लुकोज आणि क्रीम बिस्किट्स या दोन सर्वात मोठ्या कॅटेगरी आहेत. पण, ग्लुकोज सेगमेंटमध्ये अलीकडच्या काळात कोणतेच नावीन्य आलेले नाही.          सनफीस्ट बाउन्सच्या पोर्टफोलियोमध्ये ग्लुकोजची भर घातल्यामुळे क्रीम बिस्किटमध्ये आता आम्हाला वैशिष्ट्यपूर्ण कॉम्बिनेशन उपलब्ध करून देता येईल, त्याचप्रमाणे क्रीम बिस्किटचे चाहते असलेल्या ग्राहकांना नवा पर्याय उपलब्ध होईल. क्रीम बिस्किटच्या चाहत्यांना आता नवा अनुभव घेता येईल, अशी आमची अपेक्षा आहे आणि सनफीस्ट बाउन्सकडे ग्राहकांचे आकर्षण अधिक वाढेल.”          ग्लुकोजची भर असलेले सनफीस्ड बाउन्स क्रीम रु.५ आणि रु.१० या किमतीला महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, पंजाब, बिहार, झारखंड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि ओदिशा या राज्यांतील बाजारपेठांमधील सर्व दुकानांमध्ये उपलब्ध आहे.


आयटीसी च्या सनफीस्ट बाउन्सने त्यांच्या क्रीम बिस्किट रेंजमध्ये घातली ग्लुकोजची भर आयटीसी च्या सनफीस्ट बाउन्सने त्यांच्या क्रीम बिस्किट रेंजमध्ये घातली ग्लुकोजची भर Reviewed by News1 Marathi on September 06, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads