Header AD

बहुजन समाजाला अ ब क ड प्रवर्ग आरक्षण लागु करा – प्रा. लक्ष्मण ढोबळे


■बहुजन रयत परिषदेची नवनिर्धार संवाद अभियान यात्रा कल्याण मध्ये...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  विकासापासुन दूर असलेल्या बहुजन समाजाला अ    प्रवर्ग आरक्षण लागु करण्याची मागणी माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी केली आहे. बहुजन रयत परिषदेतर्फे अण्णाभाउ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त १८ जुलै पासुन ५ सप्टेंबर पर्यंत नवनिर्धार अभियानाची सुरूवात झालेली आहे. आज हि यात्रा कल्याणमध्ये दाखल झाली यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ढोबळे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बहुजन रयत परिषदचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रमेश गालफाडे, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा अॅड. कोमल साळुंखे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.  मागील ३० दिवस राज्यातील विबिध शहरात फिरत असून आता दौरा अंतिम असून लवकरच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदनच्या माध्यमातून समस्या मांडणार असल्याची माहिती प्रा लक्ष्मण ढोबळे यांनी दिली. बहुजन परिषदेत अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त नवनिर्धार संवाद अभियानाची सुरूवात झालेली आहे. साधारण ३५ दिवसात २८ जिल्ह्यांचा दौरा आयोजित करण्यात आला असून आज कल्याण मध्ये दौरा आला असता प्रा लक्ष्मण ढोबळे यांनी दोऱ्याबद्दल माहिती सांगितली.या दौऱ्यात शिक्षणआरोग्यशासकिय योजनांना महत्त्व देत अंधश्रद्धेला विरोध करून व्यसन मुक्तीचा प्रचार करीत आहे. रेशन दुकानाचा माल गरीबांना वेळेवर मिळत नाही. अश्या -याच तकारी परिषदेच्या कार्यकत्यांनी केल्या आहेत. दरम्यान हा सर्व डाटा जमा करण्यात आला असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन समस्या मांडणार असल्याचे सांगितले.बहुजन रयत परिषद ही प्रामुख्याने बहुजनांचे सामाजिक विकासाच्या दृष्टीने स्थापित झालेली वैचारीक संघटना आहे. विकासापासुन दूर असलेल्या बहुजन समाजाला अ     प्रवर्ग आरक्षण लागु करणे शासनाकडून मिळत असलेल्या योजना विकासात्मक बाबीचा  प्रामुख्याने शासनाकडून पाठपुरावा करणे. जात प्रमाणपत्र, उत्पन्न, वास्तव्य प्रमाणपत्र राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तसेच शासकीय कार्यालये व न्यायालय यांच्या समोर दाखल करायच्या इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर आकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क माफ केलेले आहे. शासकीय कार्यालयाने मुद्रांक शुल्क मागणी केल्यास अशी लेखी तकार केल्यास त्यांची परिषदेकडून दखल घेतली जाईलतसेच राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रम ही योजना उद्योग संचालनालय मार्फत प्रत्येक  जिल्हा उद्योग केंद्रात राबविण्यात येणार असल्याचे ढोबळे यांनी सांगितले.महिलांचे वाढते अत्याचार यामुळे मोठा महिला वर्ग भयभीत झाला आहे. महिला वर्गांना संरक्षण देण्याची जबाबदारी बहुजन रयत परिषदेची आहे. बहुजन महिलांच्या सबलीकरण व सशक्तीकरण या करिता विशेष प्रयत्न करणे व दुर्लक्षित मागास कुटुंबास अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ महात्मा फुले विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ,वसंतराव नाईक विकास महामंडळ बंद अवस्थेत आहे. अनुदानीत वसतिगृहातील ८१०४ कर्मचारी अधिक्षक,स्वयंपाकी,चौकीदार,मदतनीस या चारही पदांना वेतन श्रेणी प्रमाणे पगार देण्यात यावा. प्रत्येक जिल्हयात पाच-पाच महिने पगार मानधन होत नाही. कर्मचा-यांचे दरमहा पगारी करण्यात यावे.दादासाहेब गायकवाड स्वबळीकरण योजनेचा जमिन वाटपाचा कार्यक्रम तात्काळ राबवावा. महिला बचत गटाला सरकारने आधार दिला पाहिजे आणि लघु उद्योगाला चालना देण्यात यावी. शासन स्तरावर काम करत असताना आधी महाराष्ट्राची विधानसभा भरवा मग लहान मुलांची शाळा भरवागोपिनाथ मुंडे  यांनी भटक्या विमुक्तासाठी अ ब  ड प्रवर्ग लागु करून अमंलात आणला त्याचप्रमाणे अनुसुचित जाती अ   ड प्रवर्गानुसार आरक्षण देण्याची मागणी प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी केली आहे.

बहुजन समाजाला अ ब क ड प्रवर्ग आरक्षण लागु करा – प्रा. लक्ष्मण ढोबळे बहुजन समाजाला अ ब क ड प्रवर्ग आरक्षण लागु करा – प्रा. लक्ष्मण ढोबळे Reviewed by News1 Marathi on September 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads