Header AD

तारापूर औद्योगिक वसाहतीतील उपकेंद्राची क्षमतावाढ मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या हस्ते उद्घाटन


■बोईसर-तारापूर औद्योगिक वसाहतीतील क्षमतावृद्धी केलेल्या उपकेंद्राचे उद्घाटन करताना कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर....


कल्याण: ०४ सप्टेंबर २०२१ : पालघर जिल्ह्यातील बोईसर-तारापूर औद्योगिक वसाहतीतील क्षमतावाढ केलेले वीज वितरण उपकेंद्र कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आले. या उपकेंद्रांमुळे औद्योगिक वसाहतीला अखंडित वीजपुरवठा होण्यास मोलाची मदत मिळणार आहे.          औद्योगिक वसाहतीतील क्रमांक पाच हे ३३/११ केव्ही उपकेंद्र पाच एमव्हीए क्षमतेचे होते. कॅपेक्स योजनेतून या उपकेंद्राची क्षमता १० एमव्हीए करण्यात आली आहे. परिणामी या उपकेंद्रांतर्गत औद्योगिक व इतर ग्राहकांना शाश्वत व अखंडित वीजपुरवठा मिळण्यात मोठी मदत होणार आहे. मुख्य अभियंता औंढेकर यांच्या हस्ते क्षमतावृद्धी केलेल्या उपकेंद्राचे उद्घाटन करण्यात आले.            यावेळी पालघर मंडलाच्या अभियंता किरण नागावकर, कार्यकारी अभियंते प्रताप मचिये, युवराज जरग, उपकार्यकारी अभियंते लक्ष्मण राठोड, सुरेश सुराडकर आदी उपस्थित होते. त्यानंतर मुख्य अभियंता औंढेकर यांनी औद्योगिक वसाहतीतील आयएसओ मानांकित ३३/११ केव्ही वितरण उपकेंद्राची पाहणी केली. तारापूर इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोशिएशनच्या (टिमा) पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत मुख्य अभियंता औंढेकर यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्याबाबत त्यांना आश्वासित केले.           तौक्ते चक्री वादळात अविरत परिश्रम करून औद्योगिक वसाहतीचा वीजपुरवठा त्वरित सुरळीत केल्याबद्दल असोशिएशनच्या सदस्यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे यावेळी कौतुक केले व वीज पुरवठ्याबाबत समाधान व्यक्त केले. याप्रसंगी असोशिएशनचे पदाधिकारी डी. के. राऊत, एस. आर. गुप्ता, पापा ठाकूर, संदीप सावे, नीरज पुरोहित आदी उपस्थित होते.

तारापूर औद्योगिक वसाहतीतील उपकेंद्राची क्षमतावाढ मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या हस्ते उद्घाटन तारापूर औद्योगिक वसाहतीतील उपकेंद्राची क्षमतावाढ मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या हस्ते उद्घाटन Reviewed by News1 Marathi on September 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads