Header AD

दावडीत रहिवाश्यांनी रोखला रस्ता पाण्याची पाईपलाईन तुटल्याने नागरिक नाराज





डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली जवळील  दावडी परिसरातील रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्या  अनधिकृत इमारतीवर बुधवारी कारवाई करताना पालिकेने त्याचा राडारोडा त्याच ठिकाणी टाकला होता .त्यामुळे  या इमारतीच्या मागे असलेल्या ४ ते ५ इमारतीकडे जाणारा रस्ता बंद झाला.  या राडा रोड्याखाली पाण्याच्या पाईप लाईन तुटल्यामुळे नागरिकांना पिण्यासाठी पाणी बंद झाले.



         रस्ता आणि पाणी बंद झाल्याने संतापलेल्या  नागरिकांनी  शनिवारी सायंकाळी दावडी गावाकडे रस्ता  बंद केला. जोपर्यत रस्ता मोकळा करून पाईप लाईन दुरुस्त केल्या जात नाहीत तोपर्यत मागे हटणार नसल्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे. पालिका प्रशासनाकडून दावडी गावाकडे जाणार्या डीपी रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पालिका प्रशासनाने हाती घेतले आहे. 



           या रस्त्यात बाधित होणाऱ्या नाथा ठाकरे आणि मुन्ना सिंग यांच्या मालकीच्या ५ मजली इमारतीवर पालिका प्रशासनाने कारवाई करत हि इमारत प्रभागक्षेत्र अधिकार्याच्या मार्गदर्शनाखाली जमीनदोस्त करण्यात आली. मात्र इमारत तोडल्यानंतर या इमारतीच्या राडारोड्याचा ढीग रस्त्यात टाकण्यात आला होता.त्यामुळे  या इमारतीच्या पुढील बाजूस असलेल्या चार ते पाच इमारतीकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे. 




        यामुळे हा ढिगारा हटविण्याची मागणी नागरिकाकडून पालिका प्रशासनाकडे करण्यात आली असता प्रशासनाने ती जबाबदारी आपली नसल्याचे नागरिकांना सांगितले.  या ढिगाऱ्याखाली पाण्याच्या पाईप लाईन दाबल्या गेल्याने त्या फुटल्या असल्याने मागील बाजूस असलेल्या इमारतीना दोन दिवसापासून पिण्याचे पाणी मिळालेले नसल्याने  नागरिक हैराण झाले आहेत. 



          यामुळेच  रहिवाशांनी दावडी गावाकडे जाणारा रस्ता बंद केला. यावेळी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली केल्याचे ऍड माधुरी जोशी यांनी सांगितले.
दावडीत रहिवाश्यांनी रोखला रस्ता पाण्याची पाईपलाईन तुटल्याने नागरिक नाराज दावडीत रहिवाश्यांनी रोखला रस्ता पाण्याची पाईपलाईन तुटल्याने नागरिक नाराज Reviewed by News1 Marathi on September 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads