Header AD

केडीएमसीला ठेकेदाराने लावला २० कोटींचा चुना बीओटी प्रकल्प रखडवनाऱ्या ठेकेदारा विरोधात गुन्हा दाखल
कल्याण , कुणाल  म्हात्रे  कल्याण डोंबिवली महापालिकेने सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या उद्देशाने २००५  साली सुरु केलेल्या बीओटी प्रकल्पाचा बोजवारा उडाला असून शासनाचा कोट्यावधी रुपयाचा चुराडा झाला आहे. प्रत्यक्षात मात्र  या प्रकल्पाचा नागरिकांना लाभ झालेला नाही. आता १६ वर्षानंतर बीओटी मधील ट्रक टर्मिनससाठीच्या जागेचा गैरवापर करत त्याचे भाडे आणि व्याज थकवून पालिकेचे २० कोटी ६९ लाख रुपयाचे नुकसान केल्याचा ठपका ठेवत ठेकेदार एसएस असोसीएटसचे संचालक मथ्यू जॉन कुचीनअनिल शहा आणि सीमा शहा यांच्या विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात बांधा वापर हस्तांतरित करा अर्थात बीओटी तत्वावर २००५  साली कार्यान्वित करण्यात आलेल्या योजनेत दुर्गामाता चौक येथे ट्रक टर्मिनस व पार्किंग प्लाझावाडेघर येथे स्पोर्ट्स क्लबविट्ठलवाडी पूर्वेकडे व्यापारी संकुल आणि भाजी मंडईलालचौकी येथे कम्युनिटी सेंटरडोंबिवली क्रीडांगणावर   बांधण्यात आलेला मॉलआधारवाडी येथे मॉल कम मल्टिप्लेक्स प्रकल्परूक्मिणीबाई रुग्णालयाशेजारी मॉल यासारख्या  बहुद्देशीय प्रकल्पाचा समावेश होता. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी संबधित ठेकेदारांना ३६ महीन्यांची मुदत देण्यात आली होती. मात्र या सर्वच प्रकल्पाचा बोजवारा उडाला असून अद्याप एकही प्रकल्प महापालिकेच्या ताब्यात आलेला नाही.मोक्याच्या भूखंडाची मलई ठेकेदार मागील १६ वर्षापासून लाटत आहेत. कल्याण पश्चिमेकडील दुर्गामाता चौकात प्रस्तावत करण्यात आलेल्या  ट्रक टर्मिनस आणि पार्किंग प्लाझासाठी पालिकेचा आरक्षित भूखंड  ठेकेदाराला २० वर्षांच्या  लीज करारावर देण्यात आला होता.  त्यानंतर महासभेची रीतसर परवानगी न घेताच तत्कालीन अधिकाऱ्यांनी या लीजची मुदत ६० वर्षे पर्यत वाढवली. मात्र याकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले होते. ठेकेदाराकडून हा भूखंड खोट्या कागदपत्राच्या आधारे ताब्यात घेत पालिकेची फसवणूक करण्यात आल्याचे उघड झाले आहे. संबधित संचालकांनी एस एस असोसीएटस या दोन संस्थाच्या नावातील साधर्म्यचा फायदा घेत नियमबाह्य करारनामे करत या प्रकल्पाच्या जागेवर कर्ज घेत या जागेवर थर्ड पार्टी हक्क निर्माण केला. तर पालिकेचे २० कोटी ६९ लाख ६४ हजार ५८५ इतके भाडे थकवले आहे. इतकेच नव्हे तर पालिकेविरोधातच न्यायालयात याचिका दाखल केली  पालिकेची आणि शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पालिकेचे कार्यकारी अभियंता तरूण जुनेजा यांनी महापालिकेच्या वतीने खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

केडीएमसीला ठेकेदाराने लावला २० कोटींचा चुना बीओटी प्रकल्प रखडवनाऱ्या ठेकेदारा विरोधात गुन्हा दाखल केडीएमसीला ठेकेदाराने लावला २० कोटींचा चुना बीओटी प्रकल्प रखडवनाऱ्या ठेकेदारा विरोधात गुन्हा  दाखल Reviewed by News1 Marathi on September 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads