Header AD

सावंत कुटुंबियांचा इको फ्रेंडली बाप्पा
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : पर्यावरणाची होणारी हानी लक्षात घेता. सध्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिला जात आहे. अशातच कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महा मंडळाचे संस्थापक राजेश सावंत यांच्या घरी देखील शाडूच्या माती पासून बनविलेल्या दीड फुटांच्या गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. तसेच गणरायाची सजावट देखील इकोफ्रेंडली करण्यात आली होती.       प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तींमुळे पाण्याच्या प्रदुषणात मोठी वाढ होत आहे. हे टाळण्यासाठी पर्यावरणपुरक शाडूच्या मातीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करणे काळाची गरज आहे. हि गरज लक्षात घेऊन सावंत कुटुंबीयांनी देखील पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला. दीड दिवस बाप्पाची मनोभावे पूजा अर्चा करून घरच्या घरीच गणरायाचे विसर्जन देखील करण्यात आले. सध्याची कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन कुठेही बाहेर न जाता, सावंत कुटुंबियांनी घरीच एका ड्रममध्ये शाडूची हि मूर्ती विसर्जित केली. कालांतराने विरघळलेली हि माती घरातील कुंड्यांमध्ये टाकण्यात येणार असल्याची माहिती राजेश सावंत यांनी दिली.       दरम्यान यावेळी कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे संस्थापक प्रकाश पेणकर यांचे नुकतेच निधन झाले असून त्यांना देखील यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मिलींद परदेशीसुनील जगताप, प्रसाद महाजन, कल्पेश दवे, विकी साळवे, किरण गायकवाड, आकाश सोनवणे, आतिष साळवेराजेश शेळकेधनश्री राजेश सावंतसुनीता साळवेमीनल आढावसुरेखा सोनवणे, बेबी पंकज जाधव आदींसह सावंत कुटुंबीय उपस्थित होते.   

सावंत कुटुंबियांचा इको फ्रेंडली बाप्पा सावंत कुटुंबियांचा इको फ्रेंडली बाप्पा Reviewed by News1 Marathi on September 13, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads