Header AD

बचपन बचाओ मानवता बचाओ" साठी सलोनी तोडकरी पुन्हा एकदा मैदानात
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : "बचपन बचाओ मानवता बचाओ" साठी सलोनी तोडकरी पुन्हा एकदा मैदानात उतरली असून नुकतेच तिचे यासाठी ८८ वे उपोषण पार पडले.चिरंजीवी संघटना ही बालमजुरीबालविवाहबालभीकारीबालकांच्या शैक्षणिक भविष्यासाठी  तसेच अनेक अनेक प्रश्नांवर गेली ९ वर्ष कार्यरत आहे. १६ वर्षाची  असल्यापासून "बचपन बचाओ मानवता बचाओ" या मोहिमेला सुरुवात करत आजपर्यंत तिने अनेक सोमवार वेगवेगळ्या विभागात जाऊन उपोषणं केली आहेत. इतकेच नव्हे तर त्या प्रत्येक विभागातील बालकांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवून त्यांना बालभीकर्यांना भीक देऊ नये हे पटवून दिले आहे. तसेच शैक्षणिक म्हत्वासोबतच आपल्या अधिकारांसाठी आपण कसे सतर्क राहिले पाहिजे हे वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमातून ती व तिची संपूर्ण टीम करत असते.परंतु मधल्या काळात आजारी पडल्याने ही लढाई संघटनेच्या इतर कार्यकर्त्यांनी आळीपाळीने उचलली व दर सोमवारी उपोषण केली. आता सलोनीची स्थिती सुधारली असून ८८ व्या सोमवारचे उपोषण सलोनी ने विरार येथे पार पाडले. या उपोषणाची सुरुवात संदीप जठार यांच्या हस्ते करण्यात आली असून सांगता सलोनी तोडकरी हिचे बाबा महेश तोडकरी यांनी केली असल्याची माहिती चिरंजीवी संघटनेच्या राष्ट्रीय सचिव श्वेता पाटील यांनी दिली.

बचपन बचाओ मानवता बचाओ" साठी सलोनी तोडकरी पुन्हा एकदा मैदानात बचपन बचाओ मानवता बचाओ" साठी सलोनी तोडकरी पुन्हा एकदा मैदानात Reviewed by News1 Marathi on September 07, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads