Header AD

अल्पवयीन मुलीची मोबाईल गेममधून ओळख करून केले अपहरण
डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवलीतील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या  तरुणाला  विष्णूनगर पोलिसांनी दोन दिवसात अटक केली.या प्रकरणात अल्पवयीन मुलीची ओळख मोबाईलमधील एका गेममधून झाली. अटक आरोपीने इंस्टाग्राममधून तिच्याशी संपर्क साधून तिच्याशी मैत्री वाढवली.तिला फुस लावून तिला पळवून घेऊन जाणाऱ्या तरुणाला विष्णूनगर पोलिसांना अवघ्या दोन दिवसात पकडण्यात यश आले.

 


            मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय तुकाराम महाडिक ( २१ ) असे अटक आरोपीचे नाव आहे असून तो उस्मानाबाद येथील अंजनसोंडागावात राहतो.भा.द.वि.कलम ३६३,३५४ सह लैगिक गुह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा सन २०१२ चे कलम १२ न्वये विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अल्पवयीन मुलीची अक्षय याने मोबाईल मधील एका गेममधूनओळख करून घेतली त्यानंतर इस्टाग्राम मधून तिच्याशी संपर्क करून तिच्याशी मैत्री केली.२० सप्टेंबर रोजी अक्षय सदर मुलाला घेण्यासाठी डोंबिवलीत आला.
            मुलीला आपल्या बरोबर घेऊन लोकल मधून पप्रवास केला.विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर वपोनि पंढरीनाथ भालेराव, पोलीस निरीक्षक मोहन खंदारे यांच्यामार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक घनश्याम बेंद्रे, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि गणेश वडणे यांनी तपास सुरु केला.मुलीच्या इंस्टाग्रामवर आर्या महाडिक या नावाने अक्षय तिच्याशी चॅटिंग करत होता.मुलीकडे मोबाईल नसल्याने ती आईच्या मोबाईल वरून मित्र-मैत्रिणीशी बोलत होती. 
           आईच्या मोबाईलवरील तिच्या मित्र –मैत्रिणीचा नंबरचा शोध लागला. मात्र एका नंबरबाबत तिच्या आईला माहिती नव्हती.पोलिसांनी याचा धाग पकडत या नंबरची माहिती मिळवली. इंस्टाग्रामवर आर्या महाडिक या आयडीवरून चॅटिंग करणाऱ्या महाडिक हा याच नंबर वरून मुलीशी संपर्क साधत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले.पोलिसांनी या मोबाईल नंबरच्या आधारे अक्षयचा शोध घेतला.                भिवंडी येथील काल्हेर गावात एका भाड्याच्या घरात अक्षयने ठेवलेल्या अल्पवयीन मुलीची पोलिसांनी सुटका केली.दोन दिवसात तपास यंत्रणा कामाला लावत विष्णूनगर पोलिसांनी आरोपीला पकडण्यात यश आले. पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहायक पोलीस आयुक्त जयराम मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश वडणे,पोलिस नाईक तुळशीराम लोखंडे, सचिन कांगुणे यांनी सदरची कारवाईत अथक मेहनत घेतली.

अल्पवयीन मुलीची मोबाईल गेममधून ओळख करून केले अपहरण अल्पवयीन मुलीची मोबाईल गेममधून ओळख करून केले अपहरण Reviewed by News1 Marathi on September 27, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

श्री भगवान आदेश्वर चौकाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या निधीतून सुशोभीकरण मुनिराज पुष्पेंद्र व मुनिराज रुपेंद्र यांच्या हस्ते लोकार्पण

कल्याण,  प्रतिनिधी  :  कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या निधीतून कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेच्या श्री भ...

Post AD

home ads