Header AD

धर्मवीर आनंद दिघे हार्ट केअर सेंटर मध्ये होणार मोफत मुत्रपिंड विकारांवर उपचार महापौर नरेश म्हस्के यांची गणपती निमित्त ठाणेकरांना भेट
ठाणे, ता. ९ . मुत्रपिंडाचे आजार,  शस्त्रक्रिया व उपचार घेण्यासाठी रूग्णांना आता लांब जाण्याची गरज नाही. महापौर नरेश म्हस्के यांनी नागरिकांना गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर भेट दिली असून महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयातील धर्मवीर आनंद दिघे हार्ट केअर सेंटरमध्ये मूत्रपिंडाचे आजार व त्यासंबंधी शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्यात येणार आहे. तसेच याअंतर्गत मुत्रपिंड संबधित आजारावरील सर्व उपचार मोफत होणार असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले.          पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे हार्ट केअर सेंटरमध्ये युरोलाँजी आणि युरोशस्त्रक्रिया विभाग सुरू करणेबाबत सूचना केली होती. त्या अनुषंगाने बुधवारी (८ सप्टेंबर) झालेल्या सर्वसाधारण सभेत याबाबतचा ठराव सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकमताने मंजूर केला असून याबद्ल महापौर नरेश म्हस्के यांनी सर्वपक्षीय नगरसेवकांचे तसेच महापालिका आयुक्त डॉ विपीन शर्मा यांचे देखील आभार व्यक्त केले आहेत.

 


          छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील  "धर्मवीर आनंद दिघे हार्ट केअर सेंटर" च्या माध्यमातून अनेक गरीब व गरजू रुग्णांना  नि:शुल्क कार्डीओलाजिस्ट आणि कार्डियाक सर्जन कन्स्ल्टेशन, ईसीजी, 2 डी इको, टीएमटी, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास व व्हॉल्व्ह सर्जरी, थ्रोमोबिलीशन उपचार, ट्रोप टी व ट्रोपोनिन टेस्ट, एबीसी चाचणी आदि वैद्यकीय सेवा पुरविल्या जात आहेत.            या ठिकाणी सुपर स्पेशालिटी सेवेअंतर्गत  युरो शस्त्रक्रिया विभाग सुरु करण्याबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना केली होती..  या अनुषंगाने धर्मवीर आनंद दिघे हार्ट केअर सेंटरमध्ये दोन्ही वैद्यकीय सुविधा प्लॅटिनम हॉस्पिटल लि. यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. या सेवेचा फायदा ठामपा कार्यक्षेत्रातील व ठाण्या लगत असलेल्या भिवंडी, वाडा, जव्हार, कल्याण, डोंबिवली आदि परिसरातील गरीब व आर्थिक दुर्बल घटकांना होणार असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले.

धर्मवीर आनंद दिघे हार्ट केअर सेंटर मध्ये होणार मोफत मुत्रपिंड विकारांवर उपचार महापौर नरेश म्हस्के यांची गणपती निमित्त ठाणेकरांना भेट धर्मवीर आनंद दिघे हार्ट केअर सेंटर मध्ये होणार मोफत मुत्रपिंड विकारांवर उपचार महापौर नरेश म्हस्के यांची गणपती निमित्त ठाणेकरांना भेट Reviewed by News1 Marathi on September 09, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads