Header AD

कल्याण पूर्वेतील रचना पार्क सुंकलात घरगुती गॅस थेट नागरीकांच्या स्वयंपाक घरात नगरसेवक महेश गायकवाड यांच्या प्रयत्नांना यश
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : केंद्र शासनाच्या चुकीच्या इंधन धोरणामुळे दिवसें दिवस घरगुती गॅस चे दर गगनाला भिडले आहेतनंबर लावूनही गॅस सिलेंडर वेळेवर मिळेलच याची कसल्याही प्रकारे शास्वती देता येत नाहीअशा परिस्थितीत कल्याण पूर्वेतील संतोष नगर प्रभाग क्र. ८८ मधील रचना पार्क संकुलातील सुमारे साडेतीनशे नागरीकांच्या स्वयंपाक गृहा पर्यत महानगर गॅस कंपनीचा घरगुती गॅस नगर सेवक महेश गायकवाड यांच्या पाठपुराव्याने  पाईपलाईनद्वारे पोहवण्यात आला आहे. ऐन गणोशोत्सवाच्या सणासुदीलाच हा गॅस घरात आल्यामुळे या गॅसच्या लाभार्थी महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.केंद्र शासनाच्याच योजने अंतर्गत सुमारे सातशे कुटूंबियांचे गृह संकुल असलेल्या रचना पार्क गृह संकुलाच्या इमारतींमध्ये गेल्या तिन वर्षांपूर्वी महानगर गॅस कंपनीने घरगुती वापरातील गॅस साठी प्रत्येक घराच्या कीचन मध्ये पाईप फिटींग करून ठेवलीपरंतु प्रत्यक्ष गॅस काही सुरु होत नव्हता. या बाबत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी ही बाब नगरसेवक महेश गायकवाड  यांच्या निदर्शनास आणू देताच महेश गायकवाड यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून सदरचा गॅस पुरवठा त्वरीत सुरु होणेकामी संबंधीत अधिकाऱ्यांकडे सातताने पाठपुरावा केला. या मुळे सुमारे ३५० कुटूंबियांचा गॅस पुरवठा सुरू करण्यात आला आहे.या गॅस वितरण योजनेचा शुभारंभ महेश गायकवाड यांचे हस्ते करण्यात आला. टप्प्या टप्याने संपूर्ण परिसरातील गृह संकुलातील नागरीकांना या गॅस वितरण योजनेचा लाभ होणार असल्याचे महेश गायकवाड यांनी या वेळी सांगितले. यावेळी शाखा प्रमुख प्रशांत बोटेनिलेश रसाळ, हनुमंत देसाईशशिकांत गवळीकृष्णा पाटीलचेतन परब डॉ. रवींद्र जाधवतसेच उपविभाग प्रमुख शंकर पाटील,  महिला उपविभाग प्रमुख वंदना तांबे, निलेश रसाळसुरेश रसाळ तसेच शिवसैनिकपदाधिकारी उपस्थित होते.

कल्याण पूर्वेतील रचना पार्क सुंकलात घरगुती गॅस थेट नागरीकांच्या स्वयंपाक घरात नगरसेवक महेश गायकवाड यांच्या प्रयत्नांना यश कल्याण पूर्वेतील रचना पार्क सुंकलात घरगुती गॅस थेट नागरीकांच्या स्वयंपाक घरात नगरसेवक महेश गायकवाड यांच्या प्रयत्नांना यश Reviewed by News1 Marathi on September 06, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads