Header AD

मातृदिन आणि स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या स्मृति दिना निमित्त महिलांसाठी मोफत लसीकरण




कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  दिवंगत माँ साहेब स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आणि मातृदिनानिमित्त कल्याण-डोंबिवली करातील महिलांसाठी खास विशेष मोफत लसीकरण मोहीम राबविण्यात आली.



  कुटुंबासाठी नेहमीच अधिक परिश्रम घेणारा महिलावर्ग नेहमीच आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतो याचाच विचार करून  महिला जिल्हा संघटक  विजया पोटे यांनी समस्त महिला वर्गासाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित केली होती. ज्यामध्ये अधिकाधिक महिलांनी आपली उपस्थिती दर्शवून लसीकरण याचा लाभ घेतला.



पालक मंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे,  आमदार विश्वनाथ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली हि लसीकरण मोहीम राबविण्यात आल्याचे विजया पोटे यांनी सांगितले. तसेच कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त विजय सूर्यवंशी, वैद्यकीय अधिकारी कर्मचारी या सर्वांचे लसीकरण अभियान यशस्वी केल्यामुळे त्यांनी आभार व्यक्त केले आहेत.

मातृदिन आणि स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या स्मृति दिना निमित्त महिलांसाठी मोफत लसीकरण मातृदिन आणि स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या स्मृति दिना निमित्त महिलांसाठी मोफत लसीकरण Reviewed by News1 Marathi on September 06, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads