Header AD

कल्याण शहारासाठी महाविकास आघाडीने एक रुपया निधी दिला नाही आगामी कल्याण मनपा निवडणुकीत भाजपाची सत्ता येणार- केंद्रीयमंत्री कपिल पाटील


■माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या निधीतील उद्यानाचा लोकार्पण सोहळा संपन्न...


कल्याण , कुणाल  म्हात्रे   महाविकास आघाडीने दोन वर्षात कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघात विकासासाठी एकही पैसा निधी आणला नसून माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या निधीतून अजूनही विकासकामे सुरू आहे, हाच देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्या काम करण्याच्या पद्धतीत फरक असल्याने आगमी पालिकेच्या निवडणूकांमध्ये भाजपाचीच सत्ता येणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांनी केले.


कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्यामार्फत आणलेल्या विशेष निधीतून मंजूर झालेल्या स्व लक्ष्मीबाई सिताराम कारभारी उद्यानाचा लोकार्पण सोहळा केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार नरेंद्र पवारकल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळेकल्याण शहर मंडळ प्रेमनाथ म्हात्रेनगरसेवक वरूण पाटीलप्रिया शर्मासंजय कारभारीगणेश कारभारीप्रकाश पाटीलसुचिता कारभारीमेघनाथ भंडारीजनार्धन कारभारीविनायक कारभारीकृष्णा कारभारीगणेश कारभारीगंगाराम कारभारीमोतीराम कारभारीप्रविण कारभारी,  इत्यादी मान्यवर उपस्थित होतेया उद्यानात तरुणांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी यासाठी ओपन जिममॉर्निंग वॉकसाठी जॉगिंग ट्रॅक व जेष्ठ नागरिकांसाठी बैठक व्यवस्था तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी खेळण्याची साहित्य या उद्यानात उपलब्ध करून देण्यात आले आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी विकसित केलेली ही उद्याने पूरक असल्याचेही कपिल पाटील यांनी सांगितले.

कल्याण शहारासाठी महाविकास आघाडीने एक रुपया निधी दिला नाही आगामी कल्याण मनपा निवडणुकीत भाजपाची सत्ता येणार- केंद्रीयमंत्री कपिल पाटील कल्याण शहारासाठी महाविकास आघाडीने एक रुपया निधी दिला नाही आगामी कल्याण मनपा निवडणुकीत भाजपाची सत्ता येणार- केंद्रीयमंत्री कपिल पाटील Reviewed by News1 Marathi on September 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads