Header AD

मनसेच्या वतीने गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांसाठी मार्गदर्शन शिबीर

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण मधील गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांसाठी उपयुक्त माहितीच्या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन रविवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणितमहाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना कल्याण शहर च्या वतीने करण्यात आले आहे.कल्याण पश्चिमेतील भोईरवाडी येथील सिद्धिविनायक हॉल येथे आयोजित केलेल्या या शिबिरात गृहनिर्माण संस्थेचे मानवी अभी हस्तांतरणलेखा परीक्षण, व्यवस्थापन या विषयांवर तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या  कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना कल्याण शहर संघटक प्रवीण कदम आणि उपशहर अध्यक्ष नितेश गायकवाडउपशहर अध्यक्ष दीपक साळवी यांनी केले असल्याची माहिती मनसे शाखा अध्यक्ष महेश बनकर यांनी दिली. जास्तीत जास्त संख्येने गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांनी या मार्गदर्शन शिबिराला उपस्थित राहण्याचे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात आले आहे. 

मनसेच्या वतीने गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांसाठी मार्गदर्शन शिबीर मनसेच्या वतीने गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांसाठी मार्गदर्शन शिबीर Reviewed by News1 Marathi on September 30, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शेतीसाठी चा पूरक वीटभट्टी व्यवसाय आधुनिक व कायदेशीर करण्यासाठी संघटनेचा प्रयत्न

  भिवंडी दि (प्रतिनिधी ) ठाणे पालघर जिल्ह्यात  शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या वीटभट्टी व्यवसायाला आधुनिकतेची जो...

Post AD

home ads