Header AD

गणेश मंडळांना लसीकरण केंद्र सुरू करू द्या युवासेनेचे अनमोल म्हात्रे यांनी केली थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी




कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपवायचे असेल तर जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. येत्या काही दिवसांत आपण गणेशोत्सव साजरा करू. प्रभागा प्रभागात गणेश मंडळाचे काम असते. त्यामुळे गणेश उत्सव मंडळांना लसीकरण केंद्र सुरू करण्याची परवानगी द्या जेणेकरून प्रभागा प्रभागातील नागरिकांचे लसीकरण होईल अशी मागणी शिवसेना युवासेनेचे अनमोल म्हात्रे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्याच्या आरोग्य विभागास केली आहे.



लोकमान्य टिळकांनी सर्व नागरिकांनी एकत्र यावे याकरिता सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. परंतु गेल्यावर्षी पासून कोरोना संक्रमणामुळे नागरिकांनामंडळांना मनात असूनसुद्धा गणेशोत्सव एकत्रीत साजरा करता आला नाही. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने निर्बंधही शिथिल झाले आहेत. साधेपणाने उत्सव साजरा करण्याची परवानगी राज्य शासनाने देऊ केली आहे. सध्या गरज ही नागरिकांचे लसीकरण पूर्ण होण्याची आहे. त्यातच कोरोना प्रतिबंधक लसींचा अपुरा पुरवठा यामुळे आजही अनेक नागरिक लसच्या पहिल्या डोस पासून वंचित आहेत.



गणेशोत्सवादरम्यान प्रत्येक मंडळास लसीकरण केंद्र सुरू करण्याची परवानगी दिल्यास प्रभागातील नागरिकांनाही सोयीचे होऊन जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण पूर्ण होईल. लसीकरणाचा वेग वाढवून आरोग्य सेवकांचा भारही कमी होईल. त्यासाठी लागणारा लस साठाही महापालिका प्रशासनास उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे डोंबिवली पश्चिमेचे युवासेना उपशहर अधिकारी अनमोल म्हात्रे यांनी केली आहे.


गणेश मंडळांना लसीकरण केंद्र सुरू करू द्या युवासेनेचे अनमोल म्हात्रे यांनी केली थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी गणेश मंडळांना लसीकरण केंद्र सुरू करू द्या युवासेनेचे अनमोल म्हात्रे यांनी केली थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी Reviewed by News1 Marathi on September 06, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads